चिपळुणात आज व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात आज व्याख्यान
चिपळुणात आज व्याख्यान

चिपळुणात आज व्याख्यान

sakal_logo
By

चिपळुणात आज व्याख्यान
चिपळूण ः प्लास्टिक व कचरामुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी चिपळूण पालिका व नाम फाउंडेशनतर्फे २४ ऑगस्टला "निसर्ग एक वेदना आणि संवेदना" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पालिकेच्या (कै.) श्रावणशेट दळी सभागृहात सकाळी ११ वा. हे व्याख्यान होणार आहे. रत्नागिरीतील गोगटे कॉलेजचे डॉ. प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ भाऊ काटदरे आणि मुख्याधिकारी प्रकाश शिंगटे यांनी मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन नाम संस्थेकडून केले आहे.
-----
कृषी महाविद्यालयाचे सुयश
चिपळूण ः शिरगाव (ता. रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत इनडोअर क्रीडा स्पर्धां झाल्या. स्पर्धेत खरवते येथील शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दैदिप्यमान यश संपादन केले. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ आदी इनडोअर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयाच्या सहभागी संघांनी उपविजेतेपद पटकावले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील, सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुहास आडनाईक व प्रतीक कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
------------
मनसेतर्फे गणपती सजावट स्पर्धा
राजापूर ः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, दक्षिण रत्नागिरी सहसंपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली राजापूर संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे यांच्या सहकार्याने मनसेतर्फे तालुकास्तरीय पर्यावरणपूरक ऑनलाइन गणपती सजावट स्पर्धा-२०२२ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना रोख रक्कमेसह सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवणार आहे तर, सहभागी स्पर्धकाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकाने आपल्या घरातील सजावटीचे तीन फोटो (वेगवेगळ्या अॅगलमध्ये) काढून ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीमध्ये महेश मटकर, पिंकेश बापार्डेकर यांच्याकडे द्यावेत. त्या सोबत आपले संपूर्ण नाव आणि पत्ता पाठवायचा आहे.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89580 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..