राजापूर-माझा गणेशोत्सव माझा मताधिकार सजावट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-माझा गणेशोत्सव माझा मताधिकार सजावट स्पर्धा
राजापूर-माझा गणेशोत्सव माझा मताधिकार सजावट स्पर्धा

राजापूर-माझा गणेशोत्सव माझा मताधिकार सजावट स्पर्धा

sakal_logo
By

आले गणराय--लोगो
...
माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार सजावट स्पर्धा

शासनाचा उपक्रम; प्रबोधनपर देखाव्यातून सामाजिक संदेशाचे प्रसारण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या वतीने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह वैयक्तिकरित्याही स्पर्धक सहभागी होऊ शकणार असल्याची माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार शीतल जाधव यांनी दिली.
गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक मंडळांकडून प्रबोधनपर देखावे साकारले जातात तसेच घरोघरी गणेशाचीही सुंदर आरास केली जाते. या आरासच्या माध्यमातून सामाजिक संदेशदेखील दिले जातात. याच धर्तीवर ’माझा गणेशोत्सव माझा मताधिकार'' या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफित हे साहित्य पाठवायचे आहे. मताधिकार हा १८ वर्षावरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी आपले नाव मतदारयादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडणे हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांचे माध्यमातून, घरगुती पातळीवर गणेश मखराची सजावट, गणेशदर्शनासाठी घरी येणाऱ्‍या भाविकांमधील या संबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवण्यात येतील. तसेच, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर आपल्या देखावा सजावटीतून जागृती करता येऊ शकणार आहे.
..
चौकट
९ सप्टेंबरपर्यंत पाठवा..
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपले देखावे वा सजावटीची माहिती शासनाच्या या संकेतस्थळावर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये पाठवावयाची आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन मतदार ओळखपत्राला आधारकार्डची जोडणी, मतदारनोंदणी, नाव वगळणी, तपशिलात दुरुस्ती, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या अर्हता, तारखां यांसाठी प्रसार-प्रचार केला जावा, असे आवाहन तहसीलदार शीतल जाधव यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89581 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..