रत्नागिरी- स्वरा साखळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- स्वरा साखळकर
रत्नागिरी- स्वरा साखळकर

रत्नागिरी- स्वरा साखळकर

sakal_logo
By

-rat23p4.jpg
45059
- स्वरा साखळकर.
------------
तायक्वॉंदोमध्ये स्वरा साखळकर चमकली

तीन सुवर्णसह चार पदकांची लयलूट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वॉंदो स्पर्धा देवरूख येथील मराठा भवन येथे झाली. जिल्ह्यातून जवळपास ५०० खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला. यात रत्नागिरीतील युवा मार्शल आर्ट अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या स्वरा साखळकर हिने तीन सुवर्णसह एकूण चार पदके पटकावली. स्वराची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली.
स्वराने सुरवातीला फ्री स्टाइल पुमसे प्रकारात सर्वोच्च गुण नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. त्या पाठोपाठ फ्री स्टाईल पुमसे पेअरमध्ये (जोडी) मंथन आंबेकर सोबत सुवर्णपदकाची नोंद केली. वैयक्तिक पुमसे (साधा) प्रकारात रौप्य पदक मिळवला. क्युरोगी (फाईट) प्रकारात स्वराने आपला दबदबा कायम ठेवला. अंतिम फेरीत अटीतटीच्या सामन्यात सुवर्णपदक मिळवून एकूण चार पदके मिळवली. स्वराने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीचे रत्नागिरी जिल्हा तायक्वॉंदो असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कररा यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वराला युवा मार्शल आर्ट अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक राम कररा, तेजकुमार लोखंडे, अमित यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्वरा ही चौथीमध्ये शिकत असून ल. ग. पटवर्धन शाळेची विद्यार्थिनी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89600 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..