सावंतवाडीची बाजारपेठ सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीची बाजारपेठ सज्ज
सावंतवाडीची बाजारपेठ सज्ज

सावंतवाडीची बाजारपेठ सज्ज

sakal_logo
By

swt२३२०.jpg
४५०९४
सावंतवाडीः बाजारपेठेत सजावटीचे आकर्षक साहित्य.
swt२३२१.jpg
४५०९५
सावंतवाडीः बाजारपेठेत गणेशोत्सव पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी होत आहे.

सावंतवाडीची बाजारपेठ सज्ज
गणेशोत्सावाची तयारीः सार्वजनिक मंडळांसह घरगुती मंड
निखिल माळकर ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः गणेशोत्सव अवघ्या ७ दिवसावर आल्याने तयारीला वेग आला आहे. येथील बाजारपेठ या उत्सवासाठी सजली आहे. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखील मोठ्या वर्दळ सुरू झाली आहे.
शहरातील गांधी चौक, जयप्रकाश चौक, विठ्ठल मंदिर, उभाबाजार, चितारीआळी, नारायण मंदिरच्या समोर आदी परिसरातील दुकाने गणेशोत्सवाच्या साहित्याने सजली आहेत. विशेषतः लायटिंग, प्लास्टिक माळा, सजावटीचे साहित्य, मखर यासह इतर साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांचीही रेलचेल दिसून येत आहे. याचबरोबरच घरगुती गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, आदी साहित्य खरेदी केली जात आहे. पूजा साहित्याबरोबर गणरायाला प्रिय असलेले मोदक, मिठाई आणि इतर साहित्यही सजले आहे. नवीन कपडे खरेदीबरोबर टीव्ही, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणीदेखील वाढली आहे.
झालर, कृत्रिम फुले, विविधरंगी छोट्या आकाराचे चेंडू, कापडातील आसन, गणेशमूर्ती ठेवण्यासाठी असणारी कमान आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे. शहरात सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच घरगुती स्वरुपातही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बसविल्या जातात. या गणेशमूर्तींना आकर्षक सजावट करण्यावर भर दिला जातो. पूर्वी सजावटीसाठी थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. मात्र, सध्या थर्माकोलच्या वापरास मनाई असल्याने लाकूड, कापड आदींचा वापर करून तयार केलेले सजावट साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत आले आहे. आकर्षक विद्युतमाळा आणि मखरांनी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. एलईडीमधील विद्युतमाळा लक्ष वेधून घेत आहेत तर विविध आकार आणि प्रकारातील मखर घरी घेऊन जाताना गणेशभक्त दिसत आहेत. सूर्य, ओम, बालाजी, अष्टविनायक अशा विविध प्रकारातील मखरांना विशेष पसंती मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत मखर खरेदीला चांगली मागणी आहे. व्यवसायात १० ते १५ टक्‍क्‍यांची वाढ झालेली दिसून येत आहे.

चौकट
गणेशमूर्तींचे काम ९० टक्के पूर्ण
गणेशोत्सवास ३१ पासून सुरवात होणार आहे. त्यानिमित्ताने गणेशमूर्ती साकारण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के तयार मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम मूर्तिकारांकडून सुरू आहे. गणेश चित्र शाळेत रंगकामाची लगबग दिसून येत आहे.

चौकट
निर्बंधमुक्त गणेशोत्सव
यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तीकारांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. मात्र, रंग तसेच अन्य कच्चा माल भाववाढ झाल्याने मूर्तीच्या दरांमध्ये यंदा ३० टक्के दरवाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

कोट
कोरोनाच्या निर्बंधांविना यंदा गणेशोत्सवात साजरा होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात किराणा सामान व्यापाऱ्यांनी साठवून ठेवले आहे. अद्यापपर्यंत नागरिकांचा प्रतिसाद दिसत नाही. मात्र, चतुर्थीच्या दोन ते तीन दिवस आधी चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा आहे.
- पुंडलिक दळवी, अध्यक्ष, इंदिरा गांधी व्यापारी संघटना

कोट
गणेशचतुर्थी सात दिवसांवर आली असून गणपती घरातील सजावटीसाठी रंगरगोटीचे सामान, सजावटीचे साहित्य आदी साहित्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- किसन धोत्रे, व्यावसायिक, सावंतवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89610 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..