‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा’
‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा’

‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा’

sakal_logo
By

45092
सावंतवाडी ः मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना सुरेश भोगटे.

‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा’
सावंतवाडी ः शहरात ठिकठिकाणी झाडी वाढली आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचाही मोठा वावर आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले. यावेळी प्रवीण वाडकर, महेश नार्वेकर, सतीश नार्वेकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी काळात शहरात पूर्णतः स्वच्छता राखण्यासाठी संबंधित यंत्रणेला अलर्ट करावे. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला तरी अद्याप शहरातील काही भागांत वाढलेली झाडी जशीच्या तशी आहे. त्यामुळे तो परिसर स्वच्छ करावा. शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या परिसराचीही तातडीने स्वच्छता करून घ्यावी. गणेश चतुर्थी काळात सफाई कर्मचाऱ्यांना सतर्क ठेवावे. या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचा वावर असतो. त्यामुळे कुठेही अस्वच्छता पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून नागरिकांना भीती आहे. त्यांचाही तत्काळ बंदोबस्त करावा, असे म्हटले आहे.
.................
45093
आयनल ः गावठण येथील गणेशघाट परिसरात स्वच्छता करताना महिला.

आयनल गणेशघाटाची स्वच्छता
नांदगाव ः आयनल-गावठण येथील शुभदा स्वयंसहाय्यता महिला समुहाने गणेशघाट परिसरात स्वच्छता करून परिसर गणेशभक्तांची व्यवस्था केली. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी घरोघरी सुरू आहे. रंगरंगोटी, सजावटीच्या कामांना वेग आला आहे. बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशघाटाची वाट धरली जाते. पावसाळ्यात या परिसरात गवत, झाडीझुडपे वाढून शेवाळामुळे रस्ता निसरडा झालेला असतो. याची दखल घेत महिला समुहाने संपूर्ण परिसर स्वच्छ करून निर्धोक बनवला. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी समुहाच्या अध्यक्ष भाग्यलक्ष्मी साटम, उपाध्यक्ष आरती साटम, सचिव शीतल साटम, सदस्या चंद्रकला साटम, मालती तोरसकर, सुवर्णा तोरसकर, संगीता कुबडे, नम्रता साटम, संगीता चव्हाण, अनुसया चव्हाण, अनिता माने, दीपाली साटम आदी उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89613 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..