जयश्री साने ‘कुकिंग क्विन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयश्री साने ‘कुकिंग क्विन’
जयश्री साने ‘कुकिंग क्विन’

जयश्री साने ‘कुकिंग क्विन’

sakal_logo
By

45098
आचरा ः जयश्री साने यांना गौरविताना मान्यवर.

जयश्री साने ‘कुकिंग क्विन’
आचरा : यशराज संघटनेतर्फे श्रावण मासानिमित्त आयोजित ‘कुकिंग क्विन’ स्पर्धेत जयश्री साने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अमृता कोळेकर, तर तृतीय क्रमांक वैष्णवी चिरमुले यांनी मिळविला. उत्तेजनार्थ रागिणी ढेकणे, मृणालिनी आचरेकर यांना गौरविण्यात आले. आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी, नीलेश सरजोशी, उर्मिला सांबारी आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी यशराज संघटनेचे अध्यक्ष मंदार सरजोशी, बाबाजी भिसळे, सुभाष सांबारी, सुगंधी गुरव, मारुती आचरेकर, अभिजीत जोशी, उज्ज्वला सरजोशी, आशा हजारे, परीक्षक निशिगंधा भिरवंडेकर, रुचिता आचरेकर, यशराज संघटनेच्या उर्मिला आचरेकर, मीनल कोदे, पूनम कोदे, धनश्री आचरेकर, रोहित भिरवंडेकर आदी उपस्थित होते.
...................
गणेशोत्सवासाठी जादा रेल्वे
कणकवली ः गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा रेल्वेगाड्यांना गणेशभक्तांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनातर्फे कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने जादा रेल्वेची घोषणा केली आहे. नुकतीच एलटीटी-मेंगलोर-एलटीटी या वातानुकुलीत गणेशोत्सव स्पेशल रेल्वेचीही घोषणा झाली आहे. एलटीटी-मेंगलोर (०११७३) २४, ३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबरला रात्री ८.५० वाजता एलटीटी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाचला मेंगलोरला पोहोचेल. मेंगलोर-एलटीटी (०११७४) २५ ऑगस्ट, १ व ८ सप्टेंबरला रात्री सव्वाआठला मेंगलोर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाचला एलटीटी येथे पोहोचेल. गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, आडवली, सावर्डा, विलवडे, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, मडगाव आदी थांबे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89616 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..