''ते'' 84 टॉवर पूर्ण करण्याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''ते'' 84 टॉवर पूर्ण करण्याच्या सूचना
''ते'' 84 टॉवर पूर्ण करण्याच्या सूचना

''ते'' 84 टॉवर पूर्ण करण्याच्या सूचना

sakal_logo
By

‘ते’ ८४ टॉवर पूर्ण करण्याच्या सूचना
परब, पडतेः नेटवर्क समस्येबाबत खासदार राऊत प्रयत्नशील
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः जिल्ह्यातील एकही गाव मोबाईल नेटवर्कपासून वंचित राहू नये, यासाठी खासदार विनायक राऊत यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या माध्यमातून नव्याने ८४ बीएसएनएलचे फोर जी टॉवर मंजूर झाले असून हे सर्व टॉवर दीड वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते व शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पडते म्हणाले, "संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा मोबाईल नेटवर्कमध्ये यावा, यासाठी खासदार राऊत यांचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय नागरिकही त्यांची भेट घेवून आपल्या गावात मोबाईल टॉवर व्हावा, अशी मागणी करत आहेत. जनतेच्या मागणीचा पाठपुरावा ते केंद्रात करत आहेत. त्यांच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी १०४ बीएसएनएलचे टॉवर मजूर झाले होते. त्यापैकी ७२ टॉवर पूर्ण होवून सुरू झाले आहेत. उर्वरित ३२ टॉवरचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आता नव्याने १२७ टॉवरची मागणी त्यांनी शासनाकडे केली होती. याही मागणीला यश आले असून यापैकी ६७ नवीन व १७ टॉवरचे अद्यावतीकरण असे एकूण ८४ फोर जी टॉवर मंजूर झाले आहेत. उर्वरित ६० टॉवरना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी खासदार राऊत यांचे प्रयत्न सुरू आहेत. मंजूर झालेल्या ८४ फोर जी टॉवरचे काम दीड वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राने संबंधितांना दिल्या आहेत."
------------
चौकट
विमान सेवा सुरळीत व्हावी
जिल्ह्यात विमानतळ झाले असले तरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विमान सेवा सुरळीत होण्याबरोबरच दिवसात किमान दोन विमाने आली पाहिजे व त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत यावेळी श्री. परब यांनी व्यक्त केले.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89618 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..