राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेतर्फे माजी सैनिकांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेतर्फे माजी सैनिकांचा सत्कार
राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेतर्फे माजी सैनिकांचा सत्कार

राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेतर्फे माजी सैनिकांचा सत्कार

sakal_logo
By

-rat२३p१०.jpg
45067
राजापूर ः राजापूर अर्बन बँकेच्या जानशी पठार शाखेच्यावतीने माजी सैनिकांचा सत्कार करताना प्रसन्न खांबे.
----------
राजापूर अर्बन बॅंकेतर्फे
माजी सैनिकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राजापूर अर्बन बँकेच्या जानशी पठार शाखेच्यावतीने लष्करात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करत देशरक्षणामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाला ‘सॅल्युट’ केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून बँकेच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले.
या वेळी निवेलीचे उपसरपंच एकनाथ आग्रे, बँकेचे संचालक विजय पाध्ये, वरिष्ठ अधिकारी प्रसन्न खांबे, बँकेचे शाखाधिकारी रवींद्र बांदकर, माजी सरपंच भिकाजी तारकर, ग्रामसेवक अमोल वाडेकर, मिठगवाणे ग्रामपंचायत सदस्य जान्हवी गावकर, बँकेचे कर्मचारी समीर चव्हाण, कुलदीप चव्हाण, साहील पाटील, जयेश जाधव आदी उपस्थित होते. माजी सैनिक रणजित देसाई, अब्दुलरहमान नावलेकर, अमर कासारकर, शामराव शिंदे आदींचा सन्मान करण्यात आला. या वेळी सायबर गुन्ह्यांविषयी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व आयटी विभागप्रमुख प्रसन्न खांबे यांनी मार्गदर्शन केले. युनियन बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक हरिश्चंद्र जैतापकर यांनी बँकेकडून अत्यंत उत्कृष्ट व घरपोच सेवा मिळाल्याबद्दल बँक, बँकेचे संचालक व सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89646 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..