रत्नागिरी- घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेची घोषणा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेची घोषणा!
रत्नागिरी- घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेची घोषणा!

रत्नागिरी- घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेची घोषणा!

sakal_logo
By

लोगो... आले गणराय
.........
तालुकास्तरीय घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

कांचन मालगुंडकर यांची माहिती; रोख पारितोषिक आणि चषक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त आठवडा शिल्लक राहिला आहे. सजावट साहित्य, तोरणे, विद्युतमाळा खरेदीसाठी आता बाजारात गर्दी होऊ लागली आहे. सर्व वातावरण गणेशमय होत असतानाच प्रतिवर्षाप्रमाणे प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन डिजिटल तसेच श्री निरीपजी सोसायटी आणि भंडारी युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती कांचन मालगुंडकर यांनी दिली.
गतवर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धा ऑनलाइन असूनही मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यंदाही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे मालगुंडकर यांनी सांगितले. तेव्हा गणेशभक्तांनी आता नावीन्यपूर्ण, पर्यावरणपूरक सजावट करावी, असे आवाहन त्यांनी केले. ही सजावट स्पर्धा दर्जेदार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सव स्पर्धेला अनुक्रमे १० हजार, पाच हजार व तीन हजार रुपये आणि चषक दिला जाणार आहे. तसेच विशेष उल्लेखनीय दोन हजार रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांची तीन बक्षिसे व चषक देण्यात येणार आहे.
सजावटीचा व्हिडिओ व नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख ३ सप्टेंबर आहे.
...
चौकट
घरी प्रत्यक्ष भेट देऊन अंतिम परीक्षण
स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे उत्तम आरास, देखाव्यांची पारितोषिकांच्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. त्यानंतर त्या निवडक पात्र स्पर्धकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन अंतिम परीक्षण करण्यात येईल. जास्तीत जास्त गणेशभक्तांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मालगुंडकर यांनी केले आहे.
---------------
चौकट १
स्पर्धेची नियमावली
गणेशभक्तांनी आपल्या घरी केलेली आरास किंवा देखावा याचा दोन मिनिटांचा व्हिडिओ करून आयोजकांकडे पाठवायचा आहे. उत्तम कॅमेरा किंवा उत्तम मोबाईल कॅमेऱ्याद्वारे डॉक्युमेंट व्हिडिओ पाठवावा. व्हिडिओ केवळ दोन मिनिटांचा असावा. त्याहून अधिक असल्यास ग्राह्य धरला जाणार नाही. गणेशमूर्ती, आरास, देखाव्यामध्ये सुबकता हवी. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आशय, संदेश असल्यास उत्तम. धर्माकॉल, प्लास्टिक, फ्लेक्स आदी पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचा वापर टाळावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89650 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..