देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय व्हावे
देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय व्हावे

देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय व्हावे

sakal_logo
By

kan२३२.jpg
४५१२५
मुंबई : आमदार नीतेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याबाबत मत्स्योद्योगमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.
-------------
देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय व्हावे
आमदार नितेश राणे यांची मागणी; मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन
कणकवली, ता. २३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य महाविद्यालय नसल्यामुळे येथील तरुणांना आधुनिक मत्स्य व्यवसाय, शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे देवगड तालुक्यामध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
श्री. राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि. मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि. मी. लांबी ही सिंधुदुर्गमध्ये आहे. समुद्र किनारपट्टीलगतच्या ८७ गावामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी हा तेथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय आहे. एकूण मच्छीमारांची लोकसंख्या ३२०१७ आहे. त्याचप्रमाणे विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले या ठिकाणी बंदरे व मच्छी उतरनावळ करणारे ३४ धक्के आहेत. एकूण १८२१ यांत्रिकी व १४२९ बिगर यांत्रिकी व छोटया होड्या याद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. जिल्हयामध्ये अनेक कोल्ड स्टोरेजेस असून त्याद्वारे माशांवर प्रक्रिया केली जाते. असे असूनही जिल्ह्यामध्ये मत्स्य महाविद्यालय नसल्यामुळे येथील तरुणांना आधुनिक मत्स्य व्यवसाय, शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. देवगड तालुक्यामध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी जिल्ह्यातील जनतेची बरेच वर्षांची मागणी आहे.
या ठिकाणी मत्स्य व्यवसाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक असे योग्य, निमखारे व गोड्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक पुरेशी जागा, दळणवळणाच्या सुविधा व आनंदवाडी सारखा मोठा प्रकल्प प्रगती पथामध्ये आहे. देवगड येथे महाविद्यालय सुरू झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरी व आवश्यक असणाच्या पदवी , पदव्युत्तर डॉक्टरेट सारख्या पदव्या प्राप्त करणे सोईचे होईल. जेणेकरून जास्तीत जास्त तरूण हे शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनावर कार्यरत होतील. तसेच स्वतःचे उद्योग सुरू करतील. तरी जनतेच्या मागणीनुसार देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला त्वरित मंजूरी द्यावी, अशी मागणी आमदार राणे यांनी केली आहे. यावेळी माजी जिल्‍हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89666 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..