घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच थेट सरपंच निवडीस विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच थेट सरपंच निवडीस विरोध
घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच थेट सरपंच निवडीस विरोध

घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच थेट सरपंच निवडीस विरोध

sakal_logo
By

kan233.jpg
45127
राजन तेली

घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच
थेट सरपंच निवडीस विरोध
राजन तेलींचा आरोप; भाजपाच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीका...
कणकवली, ता. २३ : सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठराविक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल, या भीतीमुळेच विरोधकांनी थेट सरपंच आणि नगराध्यक्ष या निर्णयास विरोध सुरू केला, अशी टीका भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
श्री. तेली म्हणाले, सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेने ही या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनतेचीही तीच मागणी असताना या निर्णयास विरोध करून विरोधकांनी घराणेशाही मानसिकता स्पष्ट केली आहे.
सामान्य जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीत राहावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले. आता जनतेच्या भावनांचा आदर करणारे सरकार सत्तेवर आले आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन भाजप-शिवसेना सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीविरोधी मोहिमेचा मुहूर्त महाराष्ट्रात केला आहे, असे मत व्यक्त करत श्री. तेली यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89668 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..