रत्नागिरी ः स्टरलाईट जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः स्टरलाईट जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती
रत्नागिरी ः स्टरलाईट जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

रत्नागिरी ः स्टरलाईट जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

sakal_logo
By

स्टरलाईटकडील जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

कंपनीची उच्च न्यायालयात धाव; उद्योगमंत्री सुवर्णमध्य काढणार?
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः शहराजवळच्या उद्यमनगर एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीच्या ताब्यात असलेली सुमारे ५०० एकर जागा पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी एमआयडीसीने सुरू केली आहे; मात्र कंपनीने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कंपनीशी चर्चा करून यातून सुवर्णमध्य काढल्यास या जागेवर मोठा उद्योग येण्यास मदत होणार आहे.
स्टरलाईट कंपनीच्या अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी गेल्या ४२ वर्षांपूर्वी येथील ३०० शेतकऱ्यांची ५०० एकर जमीन एमआयडीसीने संपादन केली होती; मात्र याला प्रचंड विरोध झाला. जनविरोधाच्या रेट्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता. प्रकल्पासाठी सर्वात कमी भावाने घेतलेली ही जमिन शेतकऱ्यांना अद्याप परत मिळालेली नाही. रत्नागिरी एमआयडीसीत स्टरलाईट कंपनीच्या अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी १९७१-७२ मध्ये रत्नागिरीतील ३०० शेतकऱ्यांची तब्बल ५०० एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संपादित जागेवर एमआयडीसीने बोजा लावला. १९८४ ला हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहणार होता; मात्र या प्रदूषणकारी प्रकल्पाला त्या वेळी तीव्र विरोध झाला. प्रकल्पाविरोधात मोर्चे, आंदोलने झाली. जनप्रक्षोभामुळे कंपनीला प्रकल्प थांबवावा लागला होता. स्टरलाईट कंपनी न्यायालयात गेल्याने जागेचा गुंता कायम आहे; मात्र कंपनी आजही जागेचा कर एमआयडीसीकडे भरणा करत आहे.
यापूर्वी अनेकवेळा एमआयडीसीने कंपनीला जागा परत करण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. स्वत: कंपनी सुरू करा. अन्यथा, जागा परत करा, अशी सूचना एमआयडीसीने केली होती. २०१४ पासून ही प्रक्रिया सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला मूळ जागामालकांनी पुन्हा जागा आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे; परंतु स्टरलाईट कंपनी एमआयडीसीच्या विरोधात उच्च न्यायालयात गेली. आम्ही या जागेत प्रकल्प उभा करत होतो; मात्र स्थानिकांनी आंदोलन केल्याने हा प्रकल्प रद्द करावा लागला. अशी बाजू मांडत एमआयडीसीच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने जागा परत घेण्याच्या एमआयडीसीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही बाबा आता न्यायप्रविष्ट झाली आहे.
...
चौकट
५०० एकर जागेमध्ये नवा उद्योग शक्य
दरम्यान, रत्नागिरीचे आमदार आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये झालेले नवे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या जागेवर नवा उद्योग आणण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु आता हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने सामंत यांनी कंपनीशी चर्चा करून सुवर्णमध्य काढल्यास सुमारे ५०० एकर जागेमध्ये नवा उद्योग येऊन स्थानिकांना रोजगाराचे मोठे साधन निर्माण होऊ शकते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89673 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..