खेड-खेड, दापोलीतील पदाधिकाऱ्यांशी प्रल्हादसिंह पटेलांची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेड, दापोलीतील पदाधिकाऱ्यांशी प्रल्हादसिंह पटेलांची चर्चा
खेड-खेड, दापोलीतील पदाधिकाऱ्यांशी प्रल्हादसिंह पटेलांची चर्चा

खेड-खेड, दापोलीतील पदाधिकाऱ्यांशी प्रल्हादसिंह पटेलांची चर्चा

sakal_logo
By

-rat२३p१२.jpg
45085
- खेड ः केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी संघाचे जुने कार्यकर्ते रमेश भागवत यांच्या घरी भेट दिली.
------------
मंत्री पटेल यांनी केली भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

लोकसभा निवडणुकीची तयारी; भाजपचे आता रायगडवर लक्ष
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २३ ः आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला पावणेदोन वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरी भाजपने राज्यातील काही महत्वाच्या लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विविध केंद्रीयमंत्री लोकसभा मतदार संघाचा दौरा करत आहेत. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचा दौरा खेडमधून सुरू केला.
शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे ''प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना'' आहे. कोकणातील तरुण, बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्याची संधी या योजनेतून लाभणार आहे; मात्र केंद्रशासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षात एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबवली जाणार, असे बैठकीप्रसंगी श्री. पटेल यांनी सांगितले. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विनय नातू, माजी आमदार प्रमोद जठार, खेडचे ऋषिकेश मोरे, विनोद चाळके, आबा जोशी, वैजेश सागवेकर, रोहन राठोड, संजय बुटाला, पांडुरंग पाष्टे, अनिकेत कानडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
चौकट
जुन्या कार्यकर्त्याच्या घरी दिली भेट
फक्त पक्ष नाही तर हा आमचा परिवार आहे. मी आणि पटेल आम्ही दोघेही पहिल्या कारसेवेदरम्यान उत्तरप्रदेशच्या बांदा येथील कारागृहात एकत्र होतो. मी संघाचा जुना कार्यकर्ता असलो तरी सद्यःस्थितीत माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी सक्रिय काम करत नाही. तरीदेखील मला माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी केंद्रातील मंत्री माझ्या छोट्याशा घरात आले, हे माझे भाग्यच समजतो. म्हणून भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष नाही तर तो आमचा परिवार आहे, अशी भावूक प्रतिक्रिया खेडच्या कुवारसई येथे राहणाऱ्या रमेश भागवत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89674 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..