गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज
गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज

गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज

sakal_logo
By

swt2332.jpg
45149
वेंगुर्लेः शांतता समितीच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे. सोबत पोलिस निरीक्षक अतुल जाधव व इतर.

गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज
पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडेः वेंगुर्लेत शांतता समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ः आगामी गणेश चतुर्थीच्या कालावधीत तालुक्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता या ठिकाणी नागरिक, व्यापारी यांचे चांगले सहकार्य असते. त्यामुळे उत्सवकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी येथे केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस अधीक्षक दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक आज झाली. यावेळी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, गोपनीय विभागाच्या कल्पना शिरदावडे, गुन्हा अन्वेषण विभागाचे श्री. घाग, शांतता समितीचे श्रीनिवास गावडे यांच्यासहित व्यापारी संघटना अध्यक्ष विवेक खानोलकर, माजी सभापती सुनील मोरजकर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, नम्रता कुबल, आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, देवस्थान कमिटीचे रवींद्र परब, सुष्मा प्रभुखानोलकर, रफीक शेख, रिक्षा युनियनचे एकनाथ राऊळ, भाई मोरजे यांच्यासह शांतता समिती सदस्य, पोलिस पाटील, वाहतूक पोलिस, पोलिस अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी गणपती विसर्जन काळात कोणीही अतिउत्साह दाखवू नये. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन करून वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी केले. पोलिसांमार्फत मुख्य बाजारपेठेत सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89703 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..