नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन उत्कृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन उत्कृष्ट
नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन उत्कृष्ट

नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन उत्कृष्ट

sakal_logo
By

swt२३३४.jpg

सिंधुदुर्गनगरी : जल शक्ती अभियानचे नोडल अधिकारी जयप्रकाश पांडे यांचे स्वागत करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर.

नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन उत्कृष्ट
जयप्रकाश पांडे ः सिंधुदुर्गात जलशक्ती अभियानांतर्गत कामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ः ''कॅच द रेन'' जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत चांगले काम सुरू आहे. या नैसर्गिक स्रोतांचा पाझर टिकवण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सवांचे नियोजन करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर अमृत सरोवरांची संख्या १०० पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी तसेच केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संचालक जयप्रकाश पांडे यांनी केले.
जलशक्ती अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील कामांबाबत आढावा बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जलशक्ती अभियानाचे तांत्रिक अधिकारी जितेंद्र शिंपी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, उपवनसंरक्षक आर. डी. घुणकीकर आदी उपस्थित होते.
जल संधारणचे कार्यकारी अभियंता डी. वाय. दामा यांनी प्रास्ताविक केले. तसेच संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी जिल्ह्यात सुरू असणाऱ्या कामांबाबत तसेच जिल्ह्याची संपूर्ण माहिती दिली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत या अभियानाची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नोडल अधिकारी श्री. पांडे म्हणाले, "सावंतवाडी येथील मोती तलावाबाबत सविस्तर प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. त्याचबरोबर जिल्ह्यात गुरुत्वीय पद्धतीने पाणी योजना किती ठिकाणी करता येतील, याबाबतही अभ्यास करावा. पारंपरिक जलस्रोतांचा पाझर टिकवून ठेवण्यासाठी गाळ काढण्याबाबत कार्यवाही करावी. जुन्या जलस्रोतांबाबत नोंदी ठेवाव्यात. पूर्वी आणि आता काय बदल झाले आहेत? त्याचाही विचार करावा. वाढत्या लोकसंख्या आणि नागरिकरणात नैसर्गिक, पारंपरिक जलस्रोतांची अवस्था काय आहे? त्याचे संवर्धन कसे करता येईल? याचाही अभ्यास करावा."
तांत्रिक अधिकारी शिंपी म्हणाले की, गणेशमूर्ती तसेच दुर्गामूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन स्थळी तात्पुरता हौद बांधून त्याद्वारे विसर्जनाची प्रक्रिया करता येईल का, याबाबतही प्रबोधन आणि जनजागृती करावी. यातून मूळ जलस्रोत टिकवता येऊ शकेल. ज्या ठिकाणी शक्य नाही, अशा ठिकाणी दरवर्षी गाळ काढण्यात यावा, अशा सूचना केल्या. बैठकीनंतर ही समिती जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी करण्यासाठी रवाना झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89706 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..