चिपळूण-17 कवयित्रींच्या मदतीने साकारली चारोळी दिनदर्शिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-17 कवयित्रींच्या मदतीने साकारली चारोळी दिनदर्शिका
चिपळूण-17 कवयित्रींच्या मदतीने साकारली चारोळी दिनदर्शिका

चिपळूण-17 कवयित्रींच्या मदतीने साकारली चारोळी दिनदर्शिका

sakal_logo
By

-ratchl231.jpg-
४५११९
विशाखा चितळे

१७ कवयित्रींच्या मदतीने साकारली चारोळी दिनदर्शिका

विशाखा चितळेंची संकल्पना; एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

* स्नेहकाव्य दिनदर्शिका देशातील एकमेव
* प्रत्येक तारखेला दिनविशेषासह चारोळी
* ३६५ चारोळ्यांचा समावेश

चिपळूण, ता. २३ ः येथील कवयित्री विशाखा चितळे यांच्या संकल्पनेतून स्नेहकाव्य ही चारोळी दिनदर्शिका साकारली आहे. त्यांनी चिपळूणमधील १७ कवयित्रींना सोबत घेऊन २०२२ या वर्षाची एक काव्यमय दिनदर्शिका बनवली. चितळे यांच्या या साहित्यविषयक उपक्रमांची दखल घेऊन त्यांच्या विक्रमाची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून केली आहे.
दिनविशेष चारोळ्यांची भारतातील एकमेव दिनदर्शिका म्हणून एशियन बुक ऑफ रेकॉर्डने त्यास मान्यता दिली आहे. संपूर्ण वर्षभरातील दिनविशेष यावर आधारित त्या-त्या दिवसाची एक चारोळी स्नेहकाव्य या दिनदर्शिकेचे स्वरूप आहे. प्रत्येक तारखेच्या चौकोनात दिनविशेषाचे नाव, चारोळी, कवयित्रीचे नाव आणि तारीख छापली आहे. यानुसार रोजची माहिती देणाऱ्या ३६५ चारोळ्या आहेत. सर्वात जास्त १०० चारोळ्या विशाखा चितळे यांनी लिहिल्या आहेत. त्या त्या दिवसाची तारीख पाहिल्यावर त्या दिवसाचे विशेष महत्त्व किंवा त्या दिवशी काय आहे, याची माहिती सहज मिळते.
प्रथमदर्शनी चारोळी हा काव्यप्रकार सोपा आणि सुटसुटीत वाटतो; परंतु जास्तीत जास्त माहिती कमीत कमी शब्दात बसवणे हे कौशल्याचे काम आहे. त्यामुळे कमी शब्द दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधून या चारोळ्या दिल्या आहेत. यामध्ये जागतिक व राष्ट्रीय दिनविशेष, सणवार, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी, त्या त्या महिन्यातील ऋतूवैभव, हवामान निसर्गारूप वातावरण, सामाजिक परिस्थिती या प्राधान्यक्रमाने चारोळ्या लिहिल्या आहेत. म्हणजे एका तारखेला काहीच दिनविशेष नसेल तर त्यावेळचे ऋतूवैभव किंवा सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारी चारोळी लिहिली आहे. ३६५ दिनविशेष चारोळ्या असणारी महाराष्ट्रातील ही एकमेव काव्य दिनदर्शिका आहे. वर्ष संपले तरी दिनविशेष तसेच असतात. त्यामुळे पुढेही संदर्भसाठी ही दिनदर्शिका मदत करू शकते. किंबहुना दिनदर्शिका स्वरूपात असली तरी विविध विषयांवरील चारोळ्यांचे पुस्तक समजून त्याच्या वाचनाचा आनंद केव्हाही घेता येईल. त्यामुळे काव्य संग्रहासमान असणारी ही आगळीवेगळी अनोखी दिनदर्शिका एक राज्यविक्रम आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात दिनविशेष पोस्ट करणे आणि ते साजरे करणे, हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाला आहे. अशावेळी ही काव्य दिनदर्शिका फार महत्त्वाची भूमिका निभावू शकते.
------------
कोट
लॉकडाउनमध्ये चिपळुणातील १७ कवयित्रींनी एकत्र येऊन कविता, चारोळ्या लिहिण्यास सुरवात केली. या कालावधीत काहीजणी कविता चारोळ्या लिहिण्यास शिकल्या. त्यानंतर आम्ही शंभर दिवसांत ३६५ दिवसांच्या चारोळ्या लिहिल्या. यात शंभर चारोळ्या माझ्या आहेत. कमी शब्द दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधून या चारोळ्या दिल्या आहेत. काव्य संग्रहासमान असणारी आगळीवेगळी अनोखी दिनदर्शिका एक विक्रमच आहे.
- विशाखा चितळे, कवयित्री, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89709 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..