भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश
भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

sakal_logo
By

swt२३२९.jpg
४५१४६
बांदाः मुलांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.

मडुऱ्यात शालेय साहित्य वाटप
बांदाः सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मडुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दफ्तर व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. भाजपचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांच्या हस्ते १३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान केले. यावेळी भाजप कार्यकर्ते अरुण परब, सिद्धेश परब, मुख्याध्यापक संदीप निऊंगरे आदी उपस्थित होते. अंगणवाडीतील आठ विद्यार्थ्यांना दफ्तर व खाऊ वाटप करण्यात आले. अंगणवाडी सेविका उज्ज्वला परब उपस्थित होत्या. मुख्याध्यापक निऊंगरे यांनी आभार मानले.
................
भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश
सावंतवाडीः सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले. यापैकी राहुल राऊत व अद्वय देशपांडे यांनी नॅशनल सायन्स लिम्पियाडमध्ये सुवर्णपदक, चिराग चितारी याने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक, पार्थ पाटील याने इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये झोनल रौप्य व रुपये एक हजारचे पारितोषिक प्राप्त केले. आदित्य जगताप याने नॅशनल सायबर ऑलिम्पियाडमध्ये झोनल मेडल व रुपये पाचशे पारितोषिक प्राप्त केले. मानस पाटकर याने इंटरनॅशनल सोशल सायन्स ऑलिंपियाडमध्ये मेडल ऑफ डिस्टिंक्शन प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89716 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..