''मिशन वात्सल्य'' यशस्वी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मिशन वात्सल्य'' यशस्वी करा
''मिशन वात्सल्य'' यशस्वी करा

''मिशन वात्सल्य'' यशस्वी करा

sakal_logo
By

swt२३३५.jpg
४५१५६
सिंधुदुर्गनगरीः बैठकीत बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड.

‘मिशन वात्सल्य’ यशस्वी करा
दत्तात्रय भडकवाडः सिंधुदुर्गनगरीतील बैठकीत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे एकल-विधवा झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजनेंतर्गत जिल्ह्यात सर्व तालुक्यांत एकाच वेळी, एकाच दिवशी ''शिबिर एक-लाभ अनेक'' हा उपक्रम होत आहे. गुरुवारी (ता. २५) तहसील कार्यालयात होणाऱ्या या शिबिरात लाभार्थ्यांना लाभ देऊन तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी यशस्वी करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली.
जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक व्ही. डी. कदम, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. अरुण पणदूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मुश्ताक शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक प्रियांका घाडी आदी उपस्थित होते. या बैठकीला तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी स्वागत, प्रास्ताविक करून सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने तालुका निहाय एकूण विधवांची संख्या, दिव्यांग, पात्र लाभार्थी, लाभ दिलेले आणि प्रलंबित याबाबत सविस्तर माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, "सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात दोन योजनांकरिता एक याप्रमाणे टेबलची व्यवस्था करण्यात यावी. आपापल्या तालुक्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्याबाबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता त्यांच्याकडून करून घ्यावी. त्यासंदर्भात प्रचार, प्रसिद्धी करावी आणि लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा. एकही लाभापासून लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. एखाद्यावेळी कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यास संबंधित यंत्रणेकडून करून घ्यावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा. हे शिबिर १०० टक्के यशस्वी करावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89721 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..