जिल्हा उत्कर्ष मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा उत्कर्ष मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात
जिल्हा उत्कर्ष मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात

जिल्हा उत्कर्ष मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

swt२४१.jpg
45252
पुणेः सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या ४३ व्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये जीवन गौरव आणि सिंधूभूषण पुरस्कार वितरित करण्यात आले.

जिल्हा उत्कर्ष मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात
पुण्यात रंगला सोहळाः ज्येष्ठ सभासदांचा ''जीवन गौरव''ने सन्मान
तळेरे, ता. २३ ः सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे ४३ वे वार्षिक स्नेहसंमेलन पुणे-रावेत येथील आहेर गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांना कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा यादगार ठरला.
यावेळी मंडळाचे संस्थापक अरविंद पालव, प्रमोद राणे, सल्लागार अंकुश साईल, सिंधुलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन परशुराम उर्फ भाई प्रभू, मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, उपाध्यक्ष अरुण दळवी, सेक्रेटरी अॅड. चंद्रकांत गायकवाड, खजिनदार धर्मराज सावंत, कार्याध्यक्ष विश्वास राणे, सहखजिनदार चंद्रकांत साळसकर, सहसेक्रेटरी प्रकाश साईल, ''नटसिंधू''चे अध्यक्ष राजेश कांडर उपस्थित होते.
मंडळातील कलाकार व मुलांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. या कलाकारांचा सन्मान विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आला. कलाकारांनी ‘शेरास सव्वाशेर’ ही एकांकिका सादर केली. पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत व विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार पोलिस अधिकारी अविनाश शिंदे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते केला. सुरेश वेंगुर्लेकर, प्रकाश परब, भिवा परब, विष्णू भुते, अशोक मेजरी या मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांना ''जीवन गौरव'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंडळाशी संलग्न राहून सामाजिक व विविध क्षेत्रातील कार्याबाबत पांडुरंग व प्रणिता देसाई या दाम्पत्यास ‘सिंधू भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, शिवसेनेचे हरेश नखाते, सामाजिक कार्यकर्ते रमेश काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे मालवणी भाषेत सूत्रसंचालन संतोष साटम यांनी केले. अजय पाताडे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व कोकणवासीय एकत्र आल्याचा आनंद व्यक्त केला. दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अॅड. गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89881 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..