आसोली पुलाची भाजपकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसोली पुलाची भाजपकडून पाहणी
आसोली पुलाची भाजपकडून पाहणी

आसोली पुलाची भाजपकडून पाहणी

sakal_logo
By

swt२४५.jpg
45259
आसोलीः येथील पुलाची पाहणी करताना भाजप पदाधिकारी.

आसोली पुलाची भाजपकडून पाहणी
कार्यवाहीची मागणी; बांधकाम मंत्र्यांचे लक्ष वेधणार
वेंगुर्ले, ता. २५ः गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या आसोली हायस्कूलसमोरील पूल दिवसेंदिवस खचत चालला आहे. पुलाला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे येथील एसटी वाहतूक बंद केली असून त्यामुळे २०० ते २५० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. ही अडचण लक्षात घेऊन वेंगुर्ले भाजपा पदाधिकाऱ्यांनी बांधकाम अभियंता श्री. भगत यांना सोबत घेऊन त्या पुलाची पाहणी केली. तसेच लवकरात लवकर पुलाचे अंदाजपत्रक तयार करून संबंधित प्रशासनाकडे प्रस्तावित करावे, अशी मागणी केली. याप्रश्नी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्षणार असल्याचे भाजप शिष्टमंडळाने सांगितले.
स्थानिक ग्रामस्थ दरवर्षी आसोली पुलावर पडलेली भगदाडे काँक्रिटच्या सहाय्याने बुजवून वाहतूक सुरळीत करतात; परंतु काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’ होते. बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली असता निधीची तरतूद नसल्याचे कारण पुढे करून दुर्लक्ष केला जातो. त्यामुळे पावसाच्या दिवसात ग्रामस्थांसह शाळेत शिकणाऱ्या मुलांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याची दखल घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांसह या पुलाची पाहणी केली.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, परबवाडा सरपंच पप्पू परब, ज्येष्ठ नेते प्रकाश रेगे, माजी सरपंच व महिला मोर्चाच्या सुजाता देसाई, ग्रामपंचायत सदस्य व युवा मोर्चाचे संकेत धुरी, आसोली सरपंच रिया कुडव, बुथप्रमुख गुरुनाथ घाडी, ग्रामस्थ आत्माराम घाडी, नारायण घाडी, आनंद धुरी, देवेंद्र धुरी, राकेश धुरी, संतोष चव्हाण, नंदा घाडी, विलास मेस्त्री आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89884 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..