''त्या'' ठेकेदाराला पैसे कशासाठी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''त्या'' ठेकेदाराला पैसे कशासाठी?
''त्या'' ठेकेदाराला पैसे कशासाठी?

''त्या'' ठेकेदाराला पैसे कशासाठी?

sakal_logo
By

‘त्या’ ठेकेदाराला पैसे कशासाठी?ः खोबरेकर
मालवण, ता. २५ : तालुक्यातील वायरी-तारकर्ली-देवबाग या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २८ मधील खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. यासाठी ठेकेदाराला कंत्राट दिले असून त्याची लेखी माहिती बांधकाम विभागाने दिली आहे; मात्र मिळालेल्या माहितीनुसार देवबागमधील रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी भाजप नेते दत्ता सामंत यांनी स्वतः मोफत खडी उपलब्ध करून दिली असून, ही वस्तुस्थिती असेल तर बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला कोणत्या कारणासाठी पैसे देणार? असा प्रश्न शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर यांनी केला. संबंधित ठेकेदाराला या कामाचे बिल अदा करू नये; अन्यथा शासकीय निधीचा अपव्यय केल्याप्रकरणी बांधकामच्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.
तालुक्यातील मालवण-वायरी-तारकर्ली-देवबाग या प्रमुख जिल्हा मार्गाचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेतले आहे; मात्र यातील काही ठिकाणचे काम अद्याप अपूर्ण आहे. या कामासह तालुक्यात अन्यत्र रखडलेल्या रस्त्यांची डागडुजी गणेश चतुर्थीपूर्वी करण्याची मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने बांधकामकडे करण्यात आली होती. शिवसेनेच्या या पत्रास अनुसरून बांधकामने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कंत्राट दिले आहे. चतुर्थीपूर्वी येथील रस्ता आणि रांजनाल्यावरील पुलानजीक जोड रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील, असे लेखी पत्र तालुकाप्रमुख खोबरेकरांना दिले होते. दोन दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी देवबागमधील रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी मोफत खडी उपलब्ध करून दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवरून प्रसारित झाले आहे. ही वस्तुस्थिती असेल तर रस्त्याचे काम दिलेल्या कंत्राटदाराला खड्डे बुजवण्यासाठी शासकीय निधी देणे चुकीचे आणि शासकीय निधीचा अपव्यय करणारे आहे. त्यामुळे ठेकेदाराला संबंधित कामाचे बिल अदा करू नये. या प्रकरणी बांधकामच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करून सामंत यांनी खरोखरच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साहित्य दिले आहे का? याचा खुलासा करावा. तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला बिल अदा केल्यास शिवसेना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल. तसेच आमदार नाईक यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे खोबरेकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89897 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..