चिपळूण-चाकरमान्यांची खासगी वाहतूकदारांकडून लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चाकरमान्यांची खासगी वाहतूकदारांकडून लूट
चिपळूण-चाकरमान्यांची खासगी वाहतूकदारांकडून लूट

चिपळूण-चाकरमान्यांची खासगी वाहतूकदारांकडून लूट

sakal_logo
By

गणेशोत्सवाचे वेध; लोगो
....
एसटी, रेल्वे चित्र वापरा.
.....................
प्रवास धगधगीचा; भुर्दंड तिकीट दरवाढीचा!

चाकरमान्यांची खासगी वाहतूकदारांकडून लूट; एसटीसह रेल्वे आरक्षण फुल्ल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे आणि एसटीने जादा गाड्यांची व्यवस्था केली असली तरी यावर्षी गावात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी खासगी बसचा पर्याय निवडला आहे. या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागत आहे. मुंबई, ठाण्यातून चिपळूणपर्यंत वातानुकूलित बसमधील शयनयान श्रेणीसाठी दोन ते अडीच हजार रुपये भाडे मोजावे लागत आहेत. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने अनेकांना नाईलाजाने खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारला आहे.
कोरोनामुळे २०२० मध्ये गणेशोत्सवासाठी अनेकांना कोकणात येता आले नाही. २०२१ मध्येही कोरोना आणि निर्बंधांमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्यांची संख्या कमी होती. यावेळी रुग्णसंख्या कमी असून निर्बंधही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे, एसटी, तसेच वैयक्तिक वाहनाने कोकणात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सवानिमित्त २७ ऑगस्टपासून कोकणात येणाऱ्या रेल्वेगाड्यांना गर्दी असणार आहे. मुंबई, ठाणे, बोरीवली, विरार येथून तीन हजार एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याशिवाय २७२ जादा रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत.
रेल्वे, एसटीचे आरक्षण मिळत नसल्याने अनेकांनी कोकणात जाण्यासाठी खासगी प्रवासी बसचा पर्याय निवडला आहे.
....
चौकट
पनवेल ते चिपळूणः १२०० रुपये
मुंबई, ठाणेतून कोकणात मोठ्या प्रमाणात खासगी आरामदायी गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यांचे भाडे अव्वाच्या सव्वा आहेत. आतापर्यंत या मार्गावर ज्या गाड्या सोडल्या जातात. त्यामध्ये सर्वच गाड्या वातानुकूलित आहेत. त्यामुळे सर्वच प्रवाशांकडून शयनयान श्रेणीचे बिल आकारले जात आहे. पनवेलमधून चिपळूणपर्यंत येण्यासाठी १ हजार ते १२०० रुपये आकारले जात आहे. चाकरमान्यांनी दर कमी करण्याची विनंती केल्यावर पन्नास रुपये सुद्धा कमी केले जात नाही. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजी आहे.
-------------
कोट
वातानुकूलित बसमधील शयनयान श्रेणीसाठी जादा पैसे देण्याऐवजी स्वतःचे वाहन घेवून कोकणात आलो तरी आम्हाला परवडणारे आहे. परंतू मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती चांगली नाही. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर वाहनांची संख्या मोठी असणार आहे. वाहतूक कोंडी आणि खड्यांचा त्रास आहेच, त्याशिवाय पाऊसही आहे. त्यामुळे जादा पैसे देवून गावी यावे लागणार आहे.
-राजाराम शिंदे, रा. चाकरकोप कांदिवली, मूळ रा. शिरगाव, ता. चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89900 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..