कासार्डेतील गणेश घाटाची लवकरच दुरूस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डेतील गणेश घाटाची लवकरच दुरूस्ती
कासार्डेतील गणेश घाटाची लवकरच दुरूस्ती

कासार्डेतील गणेश घाटाची लवकरच दुरूस्ती

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट लोगो
--

कासार्डेतील गणेश घाटाची लवकरच दुरूस्ती
कणकवली,ता. २४ ः कासार्डे (ता.कणकवली) गावातील तर्फेवाडी रस्‍ता ते गणेश घाटाची दुरूस्ती ग्रामपंचायतीतर्फे तातडीने केली जाईल. गणपती विसर्जनापूर्वी खचलेल्या चौथऱ्याचे दुरूस्तीचे काम करून देणार असल्याचे ग्रामसेवक गजानन कोलते यांनी लेखी कळवले आहे. या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’मधुन ‘कासार्डे गणेशमूर्ती विसर्जन स्‍थळाची दुरवस्‍था’, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल प्रशासनाने घेतल्याने स्थानिक गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.
पिंपळेश्‍वर तर्फेवाडी विकासा मंडळाचे सचिव दिनेश तर्फे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक व जिल्‍हा परिषदेच्‍या बांधकाम विभागाकडे निवेदन पाठवून दुरूस्‍ती करण्‍याबाबत विंनती केली होती. कासार्डे गावातील तर्फेवाडी गणेशमूर्ती विसर्जन स्‍थळाची दुरवस्‍था झाली होती. गव्‍हाळीजवळील जांभ्‍या दगडाचा चौथरा पूर्णपणे खचला होता. परिसरात झाडेझुडपेही वाढली आहेत. तसेच विर्जनासाठी ओढ्याकडे जाणाऱ्या पायऱ्याही निसरड्या झाल्या होत्या. तर्फेवाडीतील सर्व ग्रामस्‍थाच्‍या दीड, पाच, दहा दिवशीचे गणपतीच्‍या मूर्ती येथील चौथऱ्यावर ठेवून पूजा अर्चा करूनच मगच ओव्‍हाळावर विसर्जनासाठी नेण्याची प्रता आहे. या सर्व असुविधेमुळे पिंपळेश्‍वर तर्फेवाडी विकासा मंडळाचे सचिव दिनेश तर्फे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक व जिल्‍हा परिषदेच्‍या बांधकाम विभागाकडे निवेदन पाठवून दुरूस्‍ती करण्‍याबाबत विंनती केली होती. याबाबत ‘सकाळ’नेही प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
---
आराखडा मंजुरीसाठी
ग्रामसेवक कोलते यांनी प्रत्‍यक्ष जागेची पाहणी केली. संभाव्‍य खर्चाचा आराखडा पंचायत समिती स्‍तरावर पंधराव्‍या वित्‍त आयोगाअंतर्गत आमदार नितेश राणे यांच्‍या स्‍थानिक विकासनिधी कार्याक्रमांतर्गत तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविला. तसेच परिसराची साफसफाई श्रमदान व लोकसहभागातून करावे, असे अवाहन केल्याचे सरपंच बाळाराम तानावडे यांनी मंडळाकडे पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. विसर्जनापूर्वी दुरूस्तीचे काम होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री. तर्फे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89949 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..