प्रलंबित मागण्यांकडे ‘आशां’नी वेधले लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित मागण्यांकडे 
‘आशां’नी वेधले लक्ष
प्रलंबित मागण्यांकडे ‘आशां’नी वेधले लक्ष

प्रलंबित मागण्यांकडे ‘आशां’नी वेधले लक्ष

sakal_logo
By

45280
सिंधुदुर्गनगरी ः विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना आशा सेविका.

प्रलंबित मागण्यांकडे
‘आशां’नी वेधले लक्ष

सिंधुदुर्गनगरीत जोरदार निदर्शने

सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना निवेदन दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत दरमहा २५ हजार रुपये वेतन द्यावे, दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये मिळावेत, विनामोबदला कामांची सक्ती करू नये, सक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्या संघटनेने केल्या. ज्या कामांचा मोबदला दिला जात नाही, त्या कामांची सक्ती केली जाते, ती थांबवावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारे यांनी केली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असा प्रकार घडत असेल, त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, सर्व समस्या सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे श्री. पुजारे यांनी सांगितले. या आंदोलनात ज्येष्ठ कामगार नेते कॉ. शंकर पुजारे, शारदा खानोलकर, अनुष्का गुराम, प्रतिभा ठुंबरे, अनुष्का गुराम, वैशाली परब, ज्योती फाले, पूजा परब यांच्यासह जिल्ह्यातील आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89951 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..