नीलेश राणेच पुढील आमदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीलेश राणेच पुढील आमदार
नीलेश राणेच पुढील आमदार

नीलेश राणेच पुढील आमदार

sakal_logo
By

45301
दत्ता सामंत


नीलेश राणेच पुढील आमदार

दत्ता सामंत ः विधानसभा निवडणुकीत मीच ‘सारथी’

मालवण, ता. २४ ः निलेश राणे २०२४ ला मालवण-कुडाळचे आमदार असतील, असा ठाम विश्वास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी घुमडे (ता. मालवण) येथे व्यक्त केला. माझे आणि नीलेश राणे यांचे शत्रुत्व आहे, असे चित्र निर्माण केले जाते. अशा अफवा उठवल्या जातात. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राणे यांच्या विजयाचे सारथ्यच मीच करणार हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘नीलेश राणे हे पितृप्रेम असणारे भावनिक नेतृत्व आहे. त्यांच्यासारखा दानशूर आणि दिलदार व्यक्ती जिल्ह्याच्या राजकारणात नाही. हे वास्तव जनतेपर्यंत पोहचवू. आगामी काळात राणे आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणूनच काम करणार. काही महिन्यांपूर्वी माझ्या घरी नीलेश राणे आले. मलाच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी विचारले. अशा दिलदार स्वभावाचे हे नेतृत्व आहे. मात्र, मी सांगितले तुम्हीच आमदार व्ह्यायला हवे. मी तुमच्या प्रचाराचे सारथ्य करणार. असा शब्द त्यांना दिला तो ठाम आहे. त्यांचा विजय हेच पुढील लक्ष्य आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘मधल्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार, अशा अफवा उठवल्या गेल्या. मात्र, खरी वस्तुस्थिती खासदार विनायक राऊत यांचे पीए नागेंद्र परब व अन्य काही मंडळी माझ्या घरी आले. राणेंच्या विरोधात वक्तव्य केली. विष कालवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा मी त्यांना तिथून जाण्यासाठी सांगितले. मी दुसऱ्या पक्षात जाणार याच्या वावढ्या उठवल्या गेल्या. मात्र, सत्य लपत नाही. मी राणेंसोबत होतो. यापुढेही राणेंसोबत असणार. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जो इतिहास घडवला, तो इतिहास निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघात घडवतील. माझे राजकारणातील सर्वोच्च पद राणे आहेत आणि त्यांचा कार्यकर्ता हेच पद मला कायम मोठे सन्मानाचे राहील. त्यांच्या प्रचारार्थ आगामी काळात मालवण कुडाळ तालुक्यात मी विभागवार दौरे करणार आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89953 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..