रस्त्यावर दुकाने; तर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर दुकाने; तर कारवाई
रस्त्यावर दुकाने; तर कारवाई

रस्त्यावर दुकाने; तर कारवाई

sakal_logo
By

45298
कणकवली : शहरात रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांना सूचना करताना नगराध्यक्ष समीर नलावडे.


रस्त्यावर दुकाने; तर कारवाई

नगराध्यक्ष नलावडे ः गणेशोत्सव नियोजन व्यवस्थेची पाहणी

कणकवली, ता.२४ : गणेशोत्‍सव कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नगरपंचायतीने नियोजन केले आहे. यात भाजी, फळ आणि इतर विक्रेत्‍यांसाठी बैठक व्यवस्था करून दिली आहे. तरीही रस्त्यावर दुकाने थाटल्‍यास त्‍या विक्रेत्‍यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिला. तसेच दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थाही केली आहे. त्‍या व्यतिरिक्‍त अंडरपास किंवा अन्य ठिकाणी वाहने उभी केल्‍यास पोलिस प्रशासनाकडून कारवाई होईल, असाही इशारा त्‍यांनी दिला.
गणेशोत्‍सवातील नियोजनाची अंमलबजावणी आजपासून शहरात लागू करण्यात आली. त्‍याअनुषंगाने नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्‍य सभापती ॲड. विराज भोसले, पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, वाहतूक पोलिस चंद्रकांत माने, हवालदार मंगेश बावदने, किरण मेथे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, नगरपंचायत कर्मचारी ध्वजा उचले आदींनी आज नियोजन व्यवस्‍थेची पाहणी केली. यावेळी पटवर्धन चौकात रस्त्यावर वाहन पार्किंग तसेच विक्रेत्‍यांनी दुकाने थाटल्‍याची बाब लक्षात आली. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी स्वत: सर्व भाजी विक्रेत्‍यांना रस्त्यावरील दुकाने हटविण्यास भाग पाडले. तसेच यापुढे रस्त्यावर दुकाने आढळली तर दुकानातील साहित्‍य जप्तीसह दंडात्‍मक कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्षांनी दिला. गणेशोत्‍सव कालावधीत महामार्ग आणि बाजारपेठेत हातगाडी व्यावसायिकांना प्रतिबंध केला आहे. तरीही रस्त्यावर गाड्या उभ्या असल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे पुढील काळात हॉकर्स झोन व्यतिरिक्‍त अन्य ठिकाणी दिसणाऱ्या हातगाड्या जप्त करा असे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
---
व्यावसायिकांसाठी जागा निश्‍चित
महामार्ग आणि बाजारपेठेसह एस.एम.हायस्कूल आणि गांगोमंदिर येथील अंडरपासमध्ये दुचाकीसह, चारचाकी आणि अवजड वाहने उभी केलेली असतात. त्‍याचा वाहतुकीला अडथळा होत असल्‍याची बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली. यावेळी अंडरपासमधील सर्व वाहनांवर कारवाई करा, असे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. आझाद मेडिकल दुकानासमोरील भागात गावठी भाजी विक्री व्यावसायिकांसाठी जागा निश्‍चित करून दिल्‍या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89961 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..