लुट थांबवा, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुट थांबवा, अन्यथा आंदोलन
लुट थांबवा, अन्यथा आंदोलन

लुट थांबवा, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

45291
सावंतवाडी ः ममहावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


लुट थांबवा, अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादीचा महावितरणला इशारा; अन्यायकारक वीज दरवाढ रद्द करा


सावंतवाडी, ता. २४ ः विज बिलात शब्दांचा खेळ करुन महावितरणकडून ग्राहकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही लुट वेळीच थांबविण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादीकडून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून महावितरणला देण्यात आला. याबाबतचे निवेदन त्यांनी अधिकारी श्री. बागलकर यांना दिले.
आगामी गणेशोत्सवात एकाही ग्राहकाची वीज जोडणी तोडू नका तसेच सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली. तालुक्यात महावितरण संदर्भात ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच शहरातील समस्या घेऊन आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांबाबत महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराओ घातला. यावेळी येथे उपस्थित असलेले वीजतरणचे अधिकारी श्री. बागलकर यांचे विविध प्रश्नांवर लक्ष वेधले. यावेळी उद्योग व व्यापार सेल कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, रत्नागिरी महिला राष्ट्रवादी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, इफ्तेकार राजगुरू, संतोष जोईल, हर्षद बेग, नंदकिशोर नाईक, सिद्धेश तेंडुलकर, आसिफ शेख, नितीन सातपुते, सायली दुभाषी उपस्थित होते.
यावेळी श्री. दळवी म्हणाले की, ग्राहकांची भरमासाठ लूटमार सुरू असल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या बिलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा खेळ करुन एकाच अर्थाचे शब्द (इंधन समायोजन, वाहन आकार, वीज शुल्क, स्थिर आकार) तयार करुन विविध आकारांचा अन्यायकारक बिलात समावेश केला जात आहे. त्यामुळे ही अन्यायकारक वीज दरवाढ रद्द करुन ग्राहकांची लूट वेळीच थांबवावी, अशी मागणी केली.
एकीकडे भरमसाठ विज बिलामुळे ग्राहक हैराण झाले असताना अनेकांची वीजबिले थकीत आहेत; मात्र, आगामी गणेशोत्सव पाहता ग्राहकांची वीज जोडण्या तोडू नका, अन्यथा राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
---------------
चौकट
विद्युत खांब बदला
शहरामध्ये काही ठिकाणी विद्युत पोलांना करंट येत आहे तर बरेच विद्युत पोल जीर्ण झाले असून केव्हाही पडण्याच्या स्थितीत आहेत. याबाबत राजगुरू यांनी लक्ष वेधले. हे पोल तात्काळ बदला, अशी मागणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90000 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..