रत्नागिरी-कार्यकारी सोसायट्यांमधील आर्थिक अनियमितता चिंतेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कार्यकारी सोसायट्यांमधील आर्थिक अनियमितता चिंतेची
रत्नागिरी-कार्यकारी सोसायट्यांमधील आर्थिक अनियमितता चिंतेची

रत्नागिरी-कार्यकारी सोसायट्यांमधील आर्थिक अनियमितता चिंतेची

sakal_logo
By

रत्नागिरी जिल्हा बॅंक सभा--लोगो
....
- rat२४p३.jpg
L45346
- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करताना अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे.
---------------
सोसायट्यांची आर्थिक असक्षमता चिंतेची

बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे; कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यास तयार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः ग्राहकांनी जिल्हा बँकेत ठेवी जमा करून कर्जासाठी अन्य बँकांकडे जावे. ही प्रक्रिया सुरू झाली तरच जिल्हा बँक अधिक फायद्यात येऊ शकते. यासाठी ग्राहकांची मानसिकता बदलणे आवश्यक असून त्यांनी जिल्हा बँकेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले. त्यांनी जिल्हा बँकेमार्फत गरिब विद्यार्थ्यांना अर्थसहाय्याच्या योजना राबविण्यात येणार असून सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर केला.
जे. के. फाईल्ससमोरील साई मंगल कार्यालयात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. डॉ. चोरगे म्हणाले, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी जिल्हा बँकेच्या लाभांशावर अवलंबून न राहता त्या अधिक सक्षम करणे गरज आहे. जिल्हा बँकेला गतवर्षी ४७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. यंदा ४३ कोटी रुपयांचा नफा झाला असून १७० कोटी रुपयांचे कर्जवाटप कमी झाले आहे. सोसायट्यांमधील आर्थिक अनियमितता ही चिंतेची बाब आहे. चेअरमननी कोणावरही विश्वास ठेवून कागदांवर न पाहता सह्या करू नयेत. सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करावी. जिल्हा बँकेच्या नफ्यातून अपहारासंदर्भातील रकमेची तरतूद करावी. एक हजार रुपयांपेक्षा कमी रकमेची शेतकऱ्यांची कर्जमाफी जिल्हा बँक करणार असून त्यासाठी ६ लाख ६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोसायट्यांनी परिपूर्ण प्रस्ताव दाखल केल्यास संबंधितांना कमी व्याजदराने जिल्हा बँकेमार्फत कर्ज पुरवठ्याची तयारी आहे. सोसायट्या अधिक सक्षम झाल्याशिवाय जिल्ह्यातील सहकाराचे प्रमाण वाढणार नाही. सोसायट्यांचे उत्पन्न वाढले तरच सर्व प्रश्न सुटतील.
कार्यकारी संचालक अजय चव्हाण यांनी प्रास्ताविकासह वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठरावांचे वाचन केले. उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
--------------
चौकट
त्या विद्यार्थ्यांसाठी २२ लाख निधी राखीव
जिल्ह्यात असंख्य गरीब विद्यार्थ्यांना नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. जिल्हा बँकेने यंदा ४४ लाख रुपयांचा आकस्मिक निधी शिल्लक ठेवला आहे. त्यातील २२ लाख रुपये गरीब विद्यार्थ्यांना गणवेशासह अन्य साहित्यावर खर्च करण्यात येणार आहेत, असे डॉ. चोरगे यांनी सांगितले.
..
चौकट
जिल्हा बँकेवर विश्वास ठेवा
जिल्हा बँकेने ९३ कोटी रुपयांचे कर्ज निर्लेखित केले होते. त्यापैकी ५८ कोटी रुपयांची वसुली बँकेमार्फत करण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडे जाणाऱ्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून त्या तुलनेने जिल्हा बँकेकडे येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी जिल्हा बँकेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉ. चोरगे यांनी केले आहे.
-------
ग्राफ करावा
एक नजर...
जिल्हा बँकेला गतवर्षी नफा झालाः ४७ कोटी
यंदा नफा झालाः ४३ कोटी
कर्जवाटप कमी झालेः १७० कोटी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90021 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..