रत्नागिरी-कट्टर शिवसैनिक रहा, आमिषाला बळी पडू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कट्टर शिवसैनिक रहा, आमिषाला बळी पडू नका
रत्नागिरी-कट्टर शिवसैनिक रहा, आमिषाला बळी पडू नका

रत्नागिरी-कट्टर शिवसैनिक रहा, आमिषाला बळी पडू नका

sakal_logo
By

-rat२४p७.jpg
45321
- रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद येथील शिवसेनेच्या बैठकीत जिल्हाप्रमुख विलास चाळके यांचे स्वागत करताना वाटत विभागप्रमुख अनिकेत सुर्वे.
--------------
कट्टर शिवसैनिक रहा, आमिषाला बळी पडू नका

वाटदमधील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना नेते शेरेंचे आवाहन
रत्नागिरी, ता. २४ : तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही शिवसेना वाढवली. आमदारांना तुम्ही, आम्ही निवडून दिले. पण ते गद्दार निघाले, त्यांची कालच पक्षातून हाकलपट्टी झाली. तालुक्यातील सर्वच समाज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. कट्टर शिवसैनिक रहा, आपणच आमदार, आपण खासदार, आपणच शिवसैनिक आहात. त्यामुळे घाबरून जावू नका आणि कोणत्या आमिषाला बळी पडू नका. गद्दारांनी राजीनामा देवून निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांनी केले.
वाटद जिल्हा परिषद गटाच्या मुख्य शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेनेचे विभागप्रमुख अनिकेत सुर्वे यांनी विभागप्रमुखाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच शिवसेनेचे पदाधिकारी आले होते. जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, तालुका संपर्कप्रमुख मंगेश साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, युवासेना तालुकाध्यक्ष प्रसाद सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने आदी उपस्थित होते.
...
चौकट
गाफिल राहू नका...
तालुकाप्रमुख बंड्या साळवी म्हणाले, राज्यात कितीही आणि काही घडामोडी घडल्या तरी तालुक्यातील शिवसैनिक आहे, तिथेच आहे. त्यावर काही परिणाम होणार नाही. सेना ग्रामीण भागात घराघरांत रुजली आहे. कोण कुठे गेले आणि आले तरी पक्ष आणि शिवसेना आहे तिथेच आहे. परंतु गाफिल राहू नका.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90049 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..