हळवलमधील तारांवरील झाडी तोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळवलमधील तारांवरील झाडी तोडा
हळवलमधील तारांवरील झाडी तोडा

हळवलमधील तारांवरील झाडी तोडा

sakal_logo
By

kan252.jpg
45427
कणकवली : येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना हळवल ग्रामस्थांनी निवेदन दिले.


हळवलमधील तारांवरील झाडी तोडा
ग्रामस्थांची महावितरण कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी
कणकवली, ता. २५ : गणेशोत्सवापूर्वी हळवल शिवडाव मार्गावर वीज तारांवर वाढलेली झाडी तोडण्यात यावी, अशी मागणी हळवल ग्रामस्थांनी केली. या मागणीचे निवेदनही महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्यावतीने देण्यात आले.
हळवल शिवडाव मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती असल्याने ह्या झाडी गणेशोत्सवापूर्वी तोंडुन मार्ग मोकळा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यासोबत या भागातील वीज वाहिन्यांवर वेलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात वीज जाण्याचे प्रकार वाढतात यावर तोडगा म्हणून गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांवरील वेली तोडाव्यात अशा आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता महावितरण येथे देण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष लवू परब, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दीपेश परब,उमेश परब, दीपक राऊळ, दशरथ परब, प्रशांत गावडे, विकास गावडे, शिवा राणे, शैलेश परब, हर्षल परब, नितेश राऊळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90192 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..