तंबाखूविरोधात समाज प्रबोधनाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंबाखूविरोधात समाज प्रबोधनाची गरज
तंबाखूविरोधात समाज प्रबोधनाची गरज

तंबाखूविरोधात समाज प्रबोधनाची गरज

sakal_logo
By

swt२५२.jpg
४५४३३
सिंधुदुर्गनगरी : श्रावणी मदभावे यांचे स्वागत करताना मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संजय वालावलकर. सोबत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सतीश मदभावे.

तंबाखूविरोधात समाज प्रबोधनाची गरज
श्रावणी मदभावेः सिंधुदुर्गनगरीत पत्रकार संघातर्फे ''वार्तालाप'' कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ः आठ हजार वर्षांपूर्वी निर्मिती झालेला तंबाखू सुरुवातीला देवपूजा व औषधासाठी वापरण्यात येत होता; मात्र आता माणूस त्याचे सेवन करीत आहे. यामुळे तंबाखू उत्पादक शक्तिमान बनत असून सेवन करणारे मात्र रोगी बनत आहेत. कॅन्सरसारखे ५० टक्के आजार तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होत आहेत. जगात तंबाखू उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. यावर निर्बंध आहेत; पण त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे तंबाखूविरोधात जनजागृतीची नितांत आवश्यकता आहे, अशी माहिती वसुंधरा संस्थेच्या प्रज्ञांगण तंबाखू प्रतिबंधक अभियानाच्या व्याख्यात्या श्रावणी मदभावे यांनी मुख्यालय पत्रकार संघ आयोजित ''वार्तालाप'' कार्यक्रमात बोलताना दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा वार्तालाप कार्यक्रम बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, संस्थेचे सतीश मदभावे उपस्थित होते. पत्रकार संघ अध्यक्ष संजय वालावलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर, संदीप गावडे आदी उपस्थित होते. आजचा वार्तालाप ''व्यसनमुक्ती'' या विषयावर आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविकात सतीश मदभावे यांनी डॉ. अनिल नेरूरकर यांच्यामुळे आम्ही हे सामाजिक कार्यक्रम राबवत आहोत. तंबाखू विरोधी मोहीम राबविण्यासाठी डॉ. नेरूरकर यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमाची दखल घेत राज्याने श्रावणी मदभावे यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, तर जिल्हा प्रशासनाने युवती पुरस्कार दिला आहे, असे सांगितले.
यावेळी पुढे बोलताना श्रावणी मदभावे म्हणाल्या, "आता तंबाखू विरोधी केवळ भाषणे देऊन चालणार नाही, तर याबाबत प्रत्यक्ष जनजागृती करण्याचे काम झाले पाहिजे. तंबाखूचा जन्म दक्षिण अमेरिकेत झाला. त्यानंतर युरोपमध्ये याचा प्रसार झाला. १४९२ च्या दरम्यान याचा जगामध्ये प्रसार झाला. १६०० मध्ये तंबाखू भारतात आला. जुन्या काळात जखम झाल्यावर तंबाखू लावल्यावर वेदना कमी व्हायच्या. त्यामुळे तंबाखू औषधी असल्याचे प्रसिद्ध झाले. कोणीतरी देवाला तंबाखू ठेवल्याने इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे सुरुवातीला तंबाखू औषध व देवासाठी वापरण्यास सुरुवात झाली; मात्र नंतर ''किक'' येण्यासाठी त्याचा वापर सुरू झाला. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळाले. हे आजार वाढत असून तंबाखू सेवन थांबले नाही तर भविष्यात मोठा धोका संभवतो."
त्या पुढे म्हणाल्या, "भारतात तंबाखू उत्पादन सुरू होऊन ४०० वर्षे झाली. तंबाखू सर्वाधिक उत्पादन घेणारा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. यामुळे उत्पादक शक्तिमान तर सेवन करणारे रोगी बनत चालले आहेत. कॅन्सर होणाऱ्या रुग्णांत ५० टक्के प्रमाण तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. तंबाखू सेवनाने कॅन्सर झालेल्या रुग्णांचे मृत्यू प्रमाण २० टक्के आहे. २०२१ मध्ये जगात ३५ लाख लोकांना कॅन्सर झाला. यातील ४२ टक्के तंबाखू सेवन करणारे होते. या रुग्णांत ७० टक्के प्रमाण तरुणांचे आहे. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी येणारा खर्च आपल्या उत्पन्नाच्या कितीतरी जास्त पटीत असतो. राज्य शासन सर्वाधिक खर्च या आजारासाठी करीत आहे."

चौकट
नियमांचे काटेकोर पालन गरजेचे
आता प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थाला हात लावणार नाही, अशी शपथ घेतली पाहिजे. सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. तंबाखू प्रतिबंधासाठी असलेले नियम काटेकोर पाळले पाहिजेत. यासाठी जनजागृती, स्पर्धात्मक कार्यक्रम, शिबिरे, मार्गदर्शन वर्ग चळवळ पद्धतीने राबविले गेले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रबोधन आणि नियमांची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच आपण विषारी तंबाखूचा प्रसार व त्याचे सेवन करणाऱ्यांना रोखू शकतो, असा विश्वास सौ. मदभावे यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90200 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..