स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पूजा सरकारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पूजा सरकारे
स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पूजा सरकारे

स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पूजा सरकारे

sakal_logo
By

swt253.jpg
45434
मालवणः बंदर जेटी स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पूजा सरकारे यांना सन्मानित करण्यात आले.

स्टॉलधारक असोसिएशनच्या
अध्यक्षपदी पूजा सरकारे
मालवण, ता. २४ : पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या बंदर जेटी स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पूजा सरकारे यांची एकमताने निवड केल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.
येथील बंदर जेटी येथे गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ स्थानिक व्यावसायिकांच्या माध्यमातून ३५ हुन जास्त स्टॉलधारक किल्ले सिंधुदुर्गवर येणाऱ्या देश, विदेशातील लाखो पर्यटक, शिवप्रेमींना सेवा पुरवित आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही गैरसोयींना सामोरे जावे लागले नाही. बंदर जेटी परिसरात उभे असलेले स्टॉल मेरीटाईम बोर्डाच्या मालकीच्या जमिनीत असल्यामुळे हे स्टॉल काढून टाकण्यासाठी शासनाच्या कारवाईच्या नोटिसा व्यावसायिकांना येत असतात. त्यामुळे संबंधितांवर बेरोजगार होण्याची भीती आहे. यासंबंधी स्टॉलधारकांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर याविषयी मार्ग काढून व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी महासंघ स्टॉलधारकांच्या सोबत असेल, असे स्पष्ट करण्यात आले. यासाठी महासंघाच्या वतीने बंदर जेटी स्टॉलधारक असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी सरकारे यांची निवड श्री. मोंडकर यांनी जाहीर केली. महासंघाच्या महिला तालुकाध्यक्ष मेघा सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. महासंघाच्या माध्यमातून मेरीटाईम बोर्ड विभागाशी पत्र व्यवहार करून संबंधित स्टॉलधारकांना पर्यटनपूरक स्वरूप असलेले, स्वखर्चातून उभारलेले आकर्षक स्टॉल तसेच जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. स्टॉलच्या डिझाईनसाठी गुरुनाथ राणे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी श्री. राणे, शेखर गाड, मालवण शहराध्यक्ष मंगेश गावकर, विनायक परब उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90201 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..