चिपळूण ःशेअर बाजार पोचणार घरोघरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ःशेअर बाजार पोचणार घरोघरी
चिपळूण ःशेअर बाजार पोचणार घरोघरी

चिपळूण ःशेअर बाजार पोचणार घरोघरी

sakal_logo
By

शेअर बाजार चित्र वापरा
...
शेअर बाजार पोचवणार घरोघरी

राहुल बामणेंची माहिती; जिल्ह्याभर घेणार प्रशिक्षणे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः कोरोना कालावधीत झालेल्या लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाला. यातून अनेकांचा रोजगार गेला. याच कालावधीत कुटुबांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेकांनी शेअर मार्केटची कास धरली. परिणामी शेअर मार्केटमध्ये कार्यरत असलेल्यांची संख्या ३ ते ४ टक्क्यावरून ९ टक्केपर्यंत पोहोचली. त्यामुळे घराघरांतील तरुण आर्थिक साक्षर व्हावेत. त्यांच्यापर्यंत शेअर बाजाराची योग्य माहिती पोहोचावी, यासाठी जिल्हाभरात प्रशिक्षणे घेतली जाणार असल्याची माहिती उद्योजक राहुल बामणे यांनी दिली.
शेअर्स मार्केटिंग संदर्भातील कोमर्सिओ व्हायब्रन्ट एल. एल. पी. या कंपनीची जिल्हा शाखा चिपळुणात सुरू झाली. त्याचे उद्घाटन उद्योजक आणि कामथेचे सरपंच विजय माटे यांच्या हस्ते झाले. या वेळी कंपनी संचालकांनी शाखा सुरू करण्याचा हेतू स्पष्ट केला. येथील उद्योजक बामणे हे या शाखेची धुरा सांभाळणार आहेत. ते म्हणाले, अनेकजण शेअर मार्केटला जुगार म्हणून संबोधतात; मात्र या विषयी खरी माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. शहरासह ग्रामीण भागातील लोकांमध्येही शेअर मार्केटमध्ये चांगले यश मिळवण्याची क्षमता आहे; मात्र त्यांना अचूक माहिती, सल्ला व मार्गदर्शन मिळत नाही. अचूक माहिती आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास शेअर मार्केटमध्ये कमी गुंतवणुकीतदेखील चांगला फायदा होतो. या संबंधीची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी अल्पदरात कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. या संबंधी कंपनीने काही सॉफ्टवेअरदेखील निर्माण केली आहे. त्याचाही नागरिकांना लाभ घेता येणार असल्याचेही बामणे यांनी सांगितले. या वेळी कंपनीचे संचालक अमर चौगुले, अमित शिंदे, उद्योजक निहाल मालाणी, वासुदेव भांबुरे, सुधीर शिंदे, किशोर रेडिज, मंगेश माटे, मुस्तफा मेमन, रिझवान काझी, राहुल शेट्ये, प्रतीक मसुरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90233 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..