चिपळूण-एनएसएस म्हणजे अनुभवांचा खजिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-एनएसएस म्हणजे अनुभवांचा खजिना
चिपळूण-एनएसएस म्हणजे अनुभवांचा खजिना

चिपळूण-एनएसएस म्हणजे अनुभवांचा खजिना

sakal_logo
By

-rat25p18.jpg
L45476
ः चिपळूण ः डीबीजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या आरंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राध्यापक विनायक बांद्रे.
-------------
एनएसएस म्हणजे अनुभवांचा खजिनाः विनायक बांद्रे

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे अनुभव दिले जातात. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा अनुभवांचा खजिना आहे, असे मत प्रा. विनायक बांद्रे यांनी व्यक्त केले.
डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्घाटनप्रसंगी व नवीन स्वयंसेवकांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यामध्ये स्वयंसेवकांवर श्रमदान, स्वयंशिस्त, स्वावलंबन, समाजसेवा यासारखे संस्कार बिंबवले जातात. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साध्य करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी अरुण जाधव यांनी नवीन स्वयंसेवकांचे स्वागत करून या विभागातर्फे वर्षभर राबवला जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे व्यक्तिमत्व विकासातील महत्त्व समजावून सांगत स्वयंसेवकांना एनएसएस विभागात उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार स्वप्नील साडविलकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नामदेव तळप, पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90234 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..