राजापूर-पिकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-पिकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट
राजापूर-पिकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट

राजापूर-पिकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट

sakal_logo
By

-rat२५p१२.jpg
L४५४५९
राजापूर ः तरारलेली भातशेती.
----------------
पीक विमा संरक्षण; क्षेत्रासह लाभार्थींमध्ये घसरण

राजापूर तालुक्याची स्थिती; गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा लाभार्थी संख्या ८२ ने घटली; कारणांचा शोधण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीला संरक्षण मिळावे, शेतकऱ्‍याचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली आहे. गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पाऊस, विविध वादळं आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमध्ये भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांकडून यावर्षी पिकविमा उतरवण्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जाईल, असा अंदाज होता; मात्र तो फोल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी शेतकऱ्‍यांनी पिकविमा उतरवला आहे. तसेच विमा उतरवलेल्या क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.
गतवर्षी प्रधानमंत्री पिकविमा योजनेला गतवर्षी तालुक्यातील शेतकऱ्‍यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. प्रतिकूल परिस्थितीचा भातशेतीला फटका बसून शेतकऱ्‍यांचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते; मात्र आपद्ग्रस्त शेतकऱ्‍यांना पिकविम्याचे साहाय्य मिळाले होते. गतवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे भातशेतीच्या होत असलेल्या नुकसानीमुळे यावर्षी पिकविमा योजनेला तालुक्यातील शेतकऱ्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून पिकविमा उतरवणाऱ्‍या शेतकऱ्‍यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र तो फोल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पिकविमा उतरवणाऱ्‍या शेतकऱ्‍यांच्या संख्येमध्ये ८२ ने घट झाली आहे. विमा संरक्षित क्षेत्रामध्येही ५.४७ हेक्टरने घट झाली आहे. पिकाला विम्याचे संरक्षण मिळून त्याचा परतावाही मिळत असताना शेतकरी या योजनेकडे गांभीर्याने का पाहात नाहीत, याचा अभ्यास होण्याची गरज आहे.
-----------
चौकट
दृष्टिक्षेपातील राजापूर तालुका
भाताचे लागवडीचे क्षेत्र*८६०० हेक्टर
नागली*१६०० हेक्टर
------------
चौकट
राजापूरचा भात पिकविमा
वर्ष* २०२१*२०२२
एकूण विमा उतरवलेले शेतकरी*३३५*२५३
एकूण क्षेत्र (हेक्टर)*७७.७२*७२.४७
शेतकरी विमा रक्कम* ६९९७१* ७१६२८
एकूण विमा संरक्षण रक्कम*३४९८५९२*३५८१४३०
..
एक नजर..
पिकविमा उतरवणाऱ्‍यांच्या संख्येत घटः ८२
विमा संरक्षित क्षेत्रामध्येही घटः ५.४७ हेक्टर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90236 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..