राजापूर ःसाडेतीन हजार जनावरांना लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःसाडेतीन हजार जनावरांना लसीकरण
राजापूर ःसाडेतीन हजार जनावरांना लसीकरण

राजापूर ःसाडेतीन हजार जनावरांना लसीकरण

sakal_logo
By

पा २
..
45500 ः संग्रहीत
............
राजापुरात साडेतीन हजार जनावरांना
संसर्गजन्यरोग प्रतिबंधात्मक लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे अनेक आजार फोफावत आहेत. यात जनावरंही सुटलेली नाहीत. सध्या जनावरांवर सांसर्गिक गर्भपाताचे संकट घोंगावत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतर्गंत जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गातील वासरांना ही प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे.
तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार मादी जनावरांना हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील डॉ. सुर्वे यांनी दिली. बदलत्या वातावरणामुळे विविध रोग आणि साथींचा फैलाव होत असताना जनावरांनाही सांसर्गिक गर्भपाताचे संकटाचा सामना करावा लागत आहे. जनावरांना हा आजार ब्रुसेला बॅक्टेरियापासून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या संसर्गाचा परिणाम जनावरांच्या गर्भधारणेवर होतो. आजार संसर्गजन्य असल्याने त्याचा धोका एकमेकांच्या सान्निध्यातील सर्व जनावरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. अशा आजाराचा संसर्ग झाल्याची तालुक्यात जनावरे सद्यःस्थितीमध्ये आढळून आली नसली तरी पात्र असलेल्या मादी जनावरांना हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुर्वे यांनी दिली.
....
चौकट
पशुपालकांना दिलासा
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असल्याने आणि विखुरलेली गावे अन् वाड्या-वस्त्या असल्याने लसीकरण मोहिमेमध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे डॉ. सुर्वे यांनी स्पष्ट केले. या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्यापूर्वी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याचे पशुपालकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
-------------
चौकट ः
जनावरांपासून माणसांनाही धोका
जनावरांना होणारा हा आजार संसर्गजन्य आहे. त्याचा संसर्ग जनावरांना तर होतोच शिवाय बाधित झालेल्या जनावरांपासून हा संसर्ग पशुपालकांनाही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा आजार अधिक घातक असल्याने त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय शोधणे महत्वाचे ठरले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90241 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..