रांगोळी कलावंतांचा वेंगुर्लेत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळी कलावंतांचा वेंगुर्लेत सत्कार
रांगोळी कलावंतांचा वेंगुर्लेत सत्कार

रांगोळी कलावंतांचा वेंगुर्लेत सत्कार

sakal_logo
By

swt2511.jpg
45501
वेंगुर्लेः रामेश्वर देवस्थानतर्फे रांगोळी कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

रांगोळी कलावंतांचा वेंगुर्लेत सत्कार
वेंगुर्लेः आषाढमध्ये येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह उत्साहात झाला. या सप्ताह कालावधीत मंदिरात रांगोळी साकारलेल्या स्थानिक कलाकारांचा रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये हर्षाली सावंत, विलास साळगावकर, सारिका सावंत, पल्लवी सावंत, तेजस्वी सावंत, अजय खानोलकर, अमृता खानोलकर, अनिश खानोलकर, निकिता देशमुख, प्रज्वल कोयंडे, सायली सावंत, प्रेमानंद जाधव, प्रकाश शिरगावकर, चतुर पार्सेकर, मंदार भगत, मकरंद मांजरेकर, संकेत हळदणकर व हेमंत कोळसुलकर यांचा समावेश होता. यावेळी 50 वर्षे अखंड रांगोळी कला जोपासणारे रमेश नरसुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अॅड. अजित भणगे, चित्रकार सुनील नांदोसकर, अॅड. श्याम गोडकर, ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब, सचिव रवींद्र परब, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, अॅड. श्रीनिवास नाईक, महादेव मेस्त्री व निखिल घोटगे उपस्थित होते.
.................
swt2512.jpg
45502
सावंतवाडी : बांधकामच्या अनामिका चव्हाण यांना निवेदन देताना नारायण राणे व पदाधिकारी.

केसरकर समर्थकांचे बांधकामला निवेदन
सावंतवाडीः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून लगतची झाडी हटवण्यात यावी, अशी मागणी दीपक केसरकर समर्थक माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली. श्री. राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज बांधकामच्या अभियंत्या चव्हाण त्यांची भेट घेतली. यावेळी अशोक दळवी, गजानन नाटेकर, प्रकाश बिद्रे, पांडुरंग बांदेकर, संजय माजगावकर, मंगलदास देसाई, एकनाथ हळदणकर, जगन्नाथ गावडे, सदाशिव कदम, शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांचे लक्ष वेधत आगामी गणेशोत्सव काळात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेता खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे, जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये, अशी मागणी केली. याशिवाय रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यालगतची झाडी तोडण्यात यावी, अशी मागणी करून निवेदन दिले.
..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90254 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..