एसटीच्या स्मार्ट कार्डला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या स्मार्ट कार्डला मुदतवाढ
एसटीच्या स्मार्ट कार्डला मुदतवाढ

एसटीच्या स्मार्ट कार्डला मुदतवाढ

sakal_logo
By

एसटीच्या स्मार्ट कार्डला मुदतवाढ
कणकवलीः मुंबई एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्ड क्रमांकाची निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने सुरु केली होती. एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारांत ज्येष्ठ नागरिकांसाठी व अन्य म्हणजेच इतर सवलतीधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90278 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..