रत्नागिरी-राजेश नेने माऊंटेनिअरिंग अभ्यासक्रमात उत्तीर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-राजेश नेने माऊंटेनिअरिंग अभ्यासक्रमात उत्तीर्ण
रत्नागिरी-राजेश नेने माऊंटेनिअरिंग अभ्यासक्रमात उत्तीर्ण

रत्नागिरी-राजेश नेने माऊंटेनिअरिंग अभ्यासक्रमात उत्तीर्ण

sakal_logo
By

-rat२५p२.jpg
४५४६२
-रत्नागिरी- राजेश नेने
----------------
खडतर प्रशिक्षण पूर्ण; माऊंटेनिअरिंगमध्ये नेने उत्तीर्ण

रत्नागिरी, ता. २५ ः सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, गार्डियन गिरीप्रेमी संस्था पुणे व नेहरू माउंटेनिअरिंग उत्तरकाशी यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या माऊंटेनिअरिंग अँण्ड अलाईड स्पोर्टस् हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. त्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेऊन त्यातून पूर्ण देशातून ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या ४४ जणांमध्ये रत्नागिरीतून राजेश नेने या गिर्यारोहकाची निवड करण्यात आली. वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून ए ग्रेड मिळवत ते उत्तीर्ण झाले. रत्नागिरीच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा रोवला.
प्रत्येक सेमिस्टर झाल्यानंतर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होऊन त्याचा निकाल जाहीर केला. दुसऱ्या सेमिस्टरसाठी अतिउंचीवरील प्रशिक्षण म्हणजेच नेहरू माऊंटेनिअरिंग इन्सिट्यूट येथील बेसिक माऊंटेनिअरिंगचा कोर्स होता. हाच टप्पा कोर्सचा फार महत्वाचा आणि तितका अवघड होता. राजेश नेने यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून ए ग्रेड मिळवत उत्तीर्ण झाले. राजेश नेने हे रत्नागिरीतील माऊंटेनिअर्स असोसिएशन या नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
-----------
कोट...
प्रत्येक सेमिस्टर झाल्यानंतर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होऊन त्याचा निकाल जाहीर केला जात होता. दुसऱ्या सेमिस्टरसाठी अतिउंचीवरील प्रशिक्षण म्हणजेच नेहरू माऊंटेनिअरिंग इन्सिट्यूट येथील बेसिक माऊंटेनिअरिंगचा कोर्स होता. हाच टप्पा कोर्सचा फार महत्वाचा आणि तितका अवघड होता. परंतु तोही यशस्वी पुर्ण केला. मला रत्नागिरीचे नाव मोठे करता आले, याचा अभिमान आहे.
- राजेश नेने, रत्नागिरीतील पहिले माऊंटेनिअर
..
चौकट
हिमालयातील आपत्कालातील प्रशिक्षण
एक वर्षाचा अभ्यासक्रम दोन सेमिस्टरमधे विभागण्यात आला होता. पहिल्या सेमिस्टरमध्ये सह्याद्रीतील प्रशिक्षण होते तर दुसऱ्या सेमिस्टरला हिमालयातील अतिउंचीवरील प्रशिक्षण व आपत्कालातील प्रशिक्षण होते. या दोन्ही सेमिस्टरचे प्रशिक्षण हे अतिशय खडतर असे होते. या अभ्यासक्रमासाठी रत्नागिरीतून निवड झालेले राजेश नेने हे रत्नागिरीतील पहिलेच गिर्यारोहक ठरले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90298 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..