रत्नागिरी-डेरवणला क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-डेरवणला क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात
रत्नागिरी-डेरवणला क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी-डेरवणला क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

-rat२५p३१.jpg
L45540
- डेरवण ः क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी स्पर्धक.
--------
डेरवणला क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलात आयोजित आठवी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री उत्साही वातावरणात झाली. ही स्पर्धा १२, १४, १६ आणि १८ वयोगटातील मुले व मुली या दोन विभागात झाली.
स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मॅरेथॉनपटू कालिदास हिरवे, सुमंत वाईकर, डॉ. नेताजी पाटील, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संदीप तावडे, शरयू यशवंतराव, श्रीकांत पराडकर आदी उपस्थित होते. आठ वयोगटासाठी झालेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विकास नलावडे, अजय कोकाटे, विजय बागवे, उदयराज कळंबे यांच्या हस्ते झाला. स्पर्धेतील विविध गटातील प्रथम पाच क्रमांकाच्या खेळाडूंना रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल (प्रथम पाच क्रमांक अनुक्रमे)- १२ वर्षाखालील मुलांमध्ये (२ कि.मी.)- अथर्व चिगरी, श्रीरंग धुमाळ, शंतनु नवगणे, समर्थ रमेश गोंगाणे, सोहम बाळू वाघुकर, मुली- (२ कि.मी.)– हुमेरा सय्यद, ऋतुजा जाडे, पूजा सावंत, अबोली वास्के, श्रावणी चव्हाण. १४ वर्षाखालील मुले (३ कि.मी.)- अथर्व ताटे, अनिल जाधव, पृथ्वी राजभोर, शुभम सूर्यवंशी, आर्यन ढवळे. मुली (२ किमी)- श्रावणी लिबे, अनुजा पवार, मयुरी चव्हाण, आकांश देवकर, चैताली चव्हाण. १६ वर्षाखालील मुले (४ कि.मी.)- सिद्धनाथ जगताप, धनंजय चोपडू, राहुल लवाटे, पृथ्वीराज कांबळे, कारुण्य गोडकर. मुली (३ कि.मी.)- ममता पाटील, मैथिली कुर्णे, श्रेया धानवे, अक्षता रेवाळे, कोमल रेवाळे. १८ वर्षाखालील मुले (६ कि.मी.)- ज्ञानेश्वर बालिसिंग, ओंकार नलावडे, हर्षद कदम, कल्पेश देवरे, शैल सकपाळ. मुली (४ कि.मी.)- प्राची देवक, सानिका नलावडे, निकिता पवार, रुरुजा कांबळे, पूजा बनसे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90303 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..