चोरट्यास पकडा, अन्यथा ''घंटानाद'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरट्यास पकडा, अन्यथा ''घंटानाद''
चोरट्यास पकडा, अन्यथा ''घंटानाद''

चोरट्यास पकडा, अन्यथा ''घंटानाद''

sakal_logo
By

swt२५१७.jpg

सोनुर्लीः येथील मंदिरात ग्रामस्थांशी चर्चा करताना बबन साळगावकर.

चोरट्यास पकडा, अन्यथा ‘घंटानाद’
बबन साळगावकरः सोनुर्लीतील बैठकीत पोलिसांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः सोनुर्ली माऊली मंदिरातील चोरीचा छडा लागल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्णय सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर पोलिसांकडून धीम्या गतीने होणाऱ्या तपासाबाबत २९ ली सकाळी ११.३० वाजता येथील पोलिस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलनाचा इशारा साळगावकर यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.
सोनुर्ली माऊली मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीमागील चांदीची प्रभावळ व फंडपेटी फोडून आतील रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. सोनुर्ली माऊली हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात झालेली चोरी लक्षात घेता सुरुवातीपासूनच माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी आवाज उठवला होता. याबाबत सावंतवाडी पोलिस निरीक्षकांना घेराव घालून चोरट्यांना जेरबंद करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून होणारा वेळकाढूपणा लक्षात घेत आज साळगावकर यांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमेश कोरगावकर यांच्यासह सोनुर्ली माऊली मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये जोपर्यंत चोरट्याला जेरबंद करत देवीची चांदीची प्रभावळ व इतर वस्तू सापडत नाहीत, तोपर्यंत स्वस्त न बसण्याचा निर्णय घेण्यात आला. मीग्रामस्थांच्या पाठिशी उभा असून येत्या सोमवारी (ता. २९) धीम्या पोलिसा तपासाबाबत घंटा आंदोलन करणार आहे, असे स्पष्ट केले. या त्यांच्या भूमिकेला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला. देवीची महती बघून पोलिस यंत्रणेने त्वरित विशेष पथक नेमून तपासकामाला गती देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90309 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..