खेड-दापोली मतदारसंघातील सेना पदाधिकारी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-दापोली मतदारसंघातील सेना पदाधिकारी जाहीर
खेड-दापोली मतदारसंघातील सेना पदाधिकारी जाहीर

खेड-दापोली मतदारसंघातील सेना पदाधिकारी जाहीर

sakal_logo
By

-rat25p36.jpg
45550
ः मुंबई ः शिवसेना पदाधिकारी जाहीर केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
---------
दापोली मतदारसंघातील सेना कार्यकारिणी जाहीर

मुंबईतील कार्यक्रमात पक्ष व संघटन बळकट करण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः कोकणातील खेड, दापोली, मंडणगड परिसरातील शिवसेनेची नवीन कार्यकारिणी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केली.
शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या नवीन सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खेड, दापोली, मंडणगड या पट्ट्यात गेली काही वर्षे शिवसेनेचे खच्चीकरण करून इतर पक्षांना बळ देण्याचे प्रयत्न काही स्वपक्षीय नेत्यांकडूनच झाले. त्यामुळे शिवसेना पक्षाचे व संघटनेचे त्यात अतोनात नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढून पक्षाला पुन्हा नवे बळ मिळवून देण्यासाठी ही कार्यकारिणी जाहीर करत आहे.
या कार्यकारिणीत जिल्हाप्रमुखपदी शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुखपदी सुधीर कालेकर, दापोली विधानसभा संघटकपदी प्रदीप सुर्वे, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी आदेश केणे, मंडणगड तालुकाप्रमुखपदी प्रताप घोसाळकर, दापोली तालुकाप्रमुखपदी उन्मेष राजे, खेड तालुकाप्रमुखपदी विजय जाधव यांच्यासह सर्व प्रमुख पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90355 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..