श्रावणी कॉम्प्युटर संस्थेचा ''एमकेसीएल''कडून गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणी कॉम्प्युटर संस्थेचा ''एमकेसीएल''कडून गौरव
श्रावणी कॉम्प्युटर संस्थेचा ''एमकेसीएल''कडून गौरव

श्रावणी कॉम्प्युटर संस्थेचा ''एमकेसीएल''कडून गौरव

sakal_logo
By

swt२५२०.jpg
४५५९४
मुंबईः पुरस्कार स्वीकारताना श्रावणी कॉम्प्युटरच्या श्रावणी मदभावे, सतीश मदभावे.

श्रावणी कॉम्प्युटर संस्थेचा
''एमकेसीएल''कडून गौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ ः एमकेसीएलच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनला उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई येथील नेहरू सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून ९०० हून अधिक एमकेसीएलचे केंद्र समन्वयक व एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे डॉ. अनंत सरदेशमुख, डॉ. चारुदत्त माई, प्रोफेसर जे. बी. जोशी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड तसेच एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक, एमकेसीएलचे विभागीय समन्वयक यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. २०१३ मध्ये स्थापन झालेल्या श्रावणी कॉम्प्युटर संस्थेला नऊ वर्षे पूर्ण झाली. संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला काहीही अडचण येऊ नये, प्रत्येक विद्यार्थी अनुकूल वातावरणात शिकावा, यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो. प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र कॉम्प्युटर, इंटरनेट, उत्कृष्ट क्लासरुम, बैठक व्यवस्था, पोषक वातावरण या सुविधांबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर गाईडन्सचे सेमिनार्स घेतले जातात. पंचक्रोशीतील कासार्डे, तळेरे, गवाणे, वारगाव, नाधवडे, खारेपाटण, मणचे, मुटाट, फणसगाव, पेंढरी, बापार्डे या विद्यालयांतील विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
ग्रामीण भागातील मुलांमधील आत्मविश्वासाची कमतरता लक्षात घेऊन या मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा तसेच त्यांना करिअरच्या नवनव्या संधीची माहिती व्हावी, यासाठी डॉ. अनिल नेरूरकर (M.D अमेरिका), सिंधुभूमी फाउंडेशन कासार्डे आणि श्रावणी कॉम्प्युटर व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय मार्गदर्शनाचे निवासी शिबिराचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरण प्रसंगी श्रावणी कॉम्प्युटरच्या संचालिका श्रावणी मदभावे, संचालक सतीश मदभावे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90372 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..