रत्नागिरी ः पानवल धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  पानवल धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मार्गी
रत्नागिरी ः पानवल धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मार्गी

रत्नागिरी ः पानवल धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मार्गी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat25p27.jpg-
४५५२७ पानवल धरण
-------------
पानवल धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मार्गी
---
खर्च १२ कोटींवर; साठवण क्षमता वाढविणार
रत्नागिरी, ता. २५ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचा विषय काल (ता. २४)च्या अधिवेशनात तारांकित झाला. कोविडमुळे रखडलेला आठ कोटी ७४ लाख रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेकडून फेरसर्व्हे करून पानवल धरणाची दगडी बांधकामात दुरुस्ती केली जाईल. गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्यासह मजबुतीकरण, सांडव्याचे काम केले जाईल. पाच वर्षांचा कालावधी गेल्याने दुरुस्तीचा प्रस्ताव आता १२ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने ही अधिकृत माहिती दिली.
रत्नागिरी शहराला नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटीने) पाणीपुरवठा करणारे पानवल धरण अखेरची घटका मोजत आहे. १९६५ मध्ये उभारण्यात आलेल्या या धरणाच्या मजबुतीकरणासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे धरणाला प्रचंड गळती असून, साठवण क्षमताही कमी झाली आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी पाच वर्षांपूर्वी प्रस्ताव देण्यात आला होता. काँक्रिटची भिंत उभारून धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव होता. काँक्रिट भिंत उभारावी की अन्य प्रकारे दुरुस्ती करावी, यासाठी नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेकडून धरण दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. या धरण दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी सुमारे आठ कोटी ८४ लाखांची आवश्यकता होती. मात्र, कोविडमुळे हा प्रस्ताव मागे पडला होता.
आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न अधिवेशनात तारांकित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने मंत्री शंभूराज देसाई यांना त्यांनी यावर सभागृहाला उत्तर देण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, की रत्नागिरी शहराला नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आला होता. मात्र, कोविडच्या काळात निधीची कमतरता असल्याने हा प्रस्ताव मागे पडला होता. पण, आता नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेकडून पानवल धरणाचा सर्व्हे करून या धरणाची दगडी बांधकामात दुरुस्ती करून गळती कमी केली जाईल. सांडव्याचे काम करायचे आहे, तसेच गाळ काढून साठवण क्षमताही वाढवायची आहे. लवकच या प्रक्रियेला गती मिळेल. तसेच, आयुक्त, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, पालिका मुख्याधिकारी यांनाही या कामाबाबत वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
------------------
कोट
पानवल धरणाची योग्य ती माहिती शासनाला दिल्यावर या धरणाची दगडी बांधकामातून दुरुस्ती करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिकची ‘मेरी’ ही संस्था पाहणी करून पुढील कार्यवाही करेल.
- तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90377 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..