गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवजड वाहतूक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवजड वाहतूक बंद
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवजड वाहतूक बंद

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवजड वाहतूक बंद

sakal_logo
By

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यात अवजड वाहतूक बंद
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वरील अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी आणि अपघात होऊ नयेत, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही काळजी घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलिस शाखेच्यावतीने देण्यात आली आहे.
येत्या ३० पासून कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यासाठी देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपल्या गावात दाखल होणार आहेत. कोरोनानंतर यंदा मोठ्या प्रमाणात वाहने या महामार्गावरून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्याने हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक हितासाठी गणेशोत्सव काळात पनवेल ते सावंतवाडी मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद केली जाणार आहे. ही वाहतूक २७ च्या मध्यरात्री १ वाजल्यापासून ३१ ला रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. गौरी गणपती आगमन व विसर्जनादरम्यान ४ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ६ ला रात्री ८ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहील. तसेच गणपती विसर्जन व चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ९ ला सकाळी ८ वाजल्यापासून १० ला रात्री ८ वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील १६ टन व त्यापेक्षा जास्त अवजड वाहतूक बंद राहील. तसेच वाळू वाहतूक, मोठे ट्रेलर, मल्टीएक्सेल, ट्रेलर आदी वाहनांस बंदी घातली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90382 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..