चिपळूण ः वाशिष्ठीत सात फुटाने वाढली पाणीपातळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः वाशिष्ठीत सात फुटाने वाढली पाणीपातळी
चिपळूण ः वाशिष्ठीत सात फुटाने वाढली पाणीपातळी

चिपळूण ः वाशिष्ठीत सात फुटाने वाढली पाणीपातळी

sakal_logo
By

- ratchl२५१.jpg
45581
ः चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून सोडलेले पाणी.
------
-ratchl२५२.jpg
45582
ः नदीत गतीने वाहणारे पाणी.
------
-ratchl२५३.jpg
45583
ः सुरक्षिततेसाठी एनडीआरएफचे जवान तैनात केले होते. (नागेश पाटील ः सकाळ छायाचित्रसेवा)
----------------
वाशिष्ठीच्या पातळीत सात फुटांनी वाढ

कोळकेवाडीतून १० हजार क्सुसेक विसर्ग; ३ वक्र दरवाजे उचलले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः कोळकेवाडी धरणाचे ३ वक्र दरवाजे ४ फुटाने उचलून तब्बल १० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाशिष्ठी नदीपात्रात करण्यात आला. या पाण्यामुळे धरणापासून १ किलोमीटरच्या अंतरात सात फूट तर २ किलोमीटरच्या अंतरात सहा फुटाने पाणीपातळी वाढली. धरणाखालील बाजूस नदीकिनारी शासकीय जागेत अतिक्रमण झाले असले तरी या पाण्यापासून कोणाचेही नुकसान झाले नाही. चिपळूण शहर हद्दीत या पाण्याचा प्रभाव फारसा जाणवला नाही.
गतवर्षी २२ जुलै २०२१ ला येथे आलेल्या महापुरात शहरासह परिसरात पुराच्या पाण्याने सर्वाधिक उंची गाठली होती. या वेळी सह्याद्री खोऱ्यात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात महापूर आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले होते; मात्र काही जागरूक नागरिकांनी त्यावर आक्षेप घेत महापुरास कोळकेवाडी धरणाचे पाणी कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. यावर कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाने पूरपरिस्थितीत विद्युत जनित्रातून १० हजार क्सुसेक पाणी कालव्याद्वारे सोडल्याचे सांगितले होते; परंतु त्यावरही आक्षेप घेण्यात आला. शासनाने याबाबतचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त अभियंता दीपक मोडक यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासगट समिती स्थापन केली. या समितीने या आधी ३ वेळा भरती, ओहोटी व अतिवृष्टीत धरणाचे पाणी सोडून व जनरेशन बंद ठेवून पाणीपातळी मोजली. त्यासाठी सुरवातीस २ हजार क्सुसेस पाणी सोडले होते. गुरुवारी पूरपरिस्थितीवेळी सोडलेल्या पाण्याइतके १० हजार क्सुसेक पाणी थेट वाशिष्ठी नदीपात्रात धरणाच्या सांडव्यातून सोडले. सकाळी १० ते १२ असे दोन तास तीन वक्र दरवाजे ४ फुटाने उचलून पाणी सोडले.
..
चौकट
२००७ नंतर प्रथमच..
धरणाचे पाणी २००७ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले. त्यामुळे नजीकच्या वस्तीला किंवा नदीकिनारील वस्तीच्या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. वाशिष्ठी नदीवरील ५ ठिकाणी पाणीपातळीची नोंद घेण्यासाठी जलसपंदा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तैनात होते. त्याप्रमाणे धरणापासून १ किलोमिटरच्या अंतरात सात फूट तर दोन किलोमीटरच्या अंतरात सहा फुटाने पाणी वाढले. पेढांबे पुलादरम्यान सरासरी चार ते साडेचार फुटाने पातळी वाढली होती.
..
चौकट
धरणाजवळील वाड्यांत अधिक दक्षता
धरणाच्या खालील बाजूस असलेल्या कोळकेवाडीतील जोशीवाडी, पायरवाडी, पठारवाडी, नागावे सुकाईनगर, पालांडेवाडी या परिसरात अधिक दक्षता घेण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्यासह कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाचे अभियंता गायकवाड, यांत्रिकी व जलसंपदाचे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-----------
चौकट
पेढांबे पूल ते अलोरे वाहतूक बंद
पेढांबे पूल ते अलोरे मार्गावरील वाहतूक बंद केली होती. सुरक्षिततेसाठी या भागात संचारबंदीही ठेवली होती तसेच रिक्षा फिरवून गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. पेढांबे, नागावे व कोळकेवाडी येथील पुलाच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता तसेच एनडीआरएफची टीम धरणाच्या पायथ्यालगत कार्यरत होती.
---------------------------
कोट
कोळकेवाडी धरणाचे पाणी सोडण्याबाबत नियोजन करताना स्थानिक ग्रामस्थांच्या अडचणी विचारात घेणे गरजेचे होते. पाणी सोडण्यासाठी सुट्टीचा दिवस योग्य होता. गुरुवारी चाचणी घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. दहावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा दिवस असल्याने त्यांची गैरसोय झाली. त्याशिवाय या भागातील रस्ते बंद ठेवल्याने नोकरदार वर्गालाही त्रास झाला. त्यामुळे यापुढे चाचणी घेताना सुट्टीचा दिवस निवडणे योग्य ठरेल.
- नीलेश कदम, माजी सरपंच, कोळकेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90387 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..