रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

-rat२५p४३.jpg-
L४५५८९
रत्नागिरी ः चारचाकी व रिक्षाचा अपघातात रिक्षाची झालेली दुरवस्था.
-------
रिक्षाची मोटारीला धडक;
रिक्षा चालक जखमी
रत्नागिरी, ः मारुती मंदिर येथे रिक्षा चालकाने उभ्या चारचाकीला ठोकरले. या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला आहे. ही घटना मारुती मंदिर येथील साक्षी फुडस समोर बुधवारी (ता. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षा चालकाने उभ्या असलेल्या चारचाकीला ठोकर दिली. त्यामध्ये तो जखमी झाला आहे. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या रिक्षा चालकाने माळनाका येथे एका पादचाऱ्याला ठोकर दिली होती. त्यानंतर त्याने चारचाकीला ठोकरले. मात्र, यावेळी चारचाकीचा मालक हजर नव्हता. ही ठोकर एवढी जबरदस्त होती की चारचाकीचा टायर फुटला आहे तर रिक्षाच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली नाही.
-----------
जुगार खेळणाऱ्या तिघांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील जे. के. फाईल्स येथील इंदुलकर हार्डवेअर समोर दुचाकीवर बसून जुगार खेळणाऱ्या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (ता. २४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. लहु रामचंद्र पडवळ (वय ६२, रा. जे. के. फाईल्स-रत्नागिरी), सुनील दत्तात्रय लाड (वय ५२, रा. नाचणे, रत्नागिरी) आणि दीपक संभाजी पाटील (रा. मांडवी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित तिघेही बुधवारी सायंकाळी इंदुलकर हार्डवेअर दुकानासमोर दुचाकीवर बसून विनापरवाना जुगार खेळत असताना ही कारवाई केली. त्यांच्याकडून १८ हजार ४७० रुपये, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके, सहायक पेलिस फौजदार महेश टेमकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल विनायक राजवैद्य यांनी केली आहे.
----------
शहरात दोन दारू अड्ड्यांवर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील राजिवडा पुलाखाली आणि बेलबाग या दोन ठिकाणी शहर पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मिळून १ हजार २९५ रुपयांची २४ लिटर दारू जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांचन चंद्रकांत पारकर (वय ६५, रा. राजीवडा-रत्नागिरी) व मोहमद अब्बास मुकादम (वय ४७, रा. अजमेरीनगर, मजगाव-रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. या घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी सव्वासहा ते आठ या कालावधीत निदर्शनास आल्या. दोन्ही संशयित विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस नाईक दुर्वा शेट्ये यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90393 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..