दाभोळ- दोन एसटी बसेसची समोरासमोर ठोकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ- दोन एसटी बसेसची समोरासमोर ठोकर
दाभोळ- दोन एसटी बसेसची समोरासमोर ठोकर

दाभोळ- दोन एसटी बसेसची समोरासमोर ठोकर

sakal_logo
By

-rat२५p४१.jpg
45587
ः मौजे दापोली ः अपघातातील बसेस.
---------
एसटींची धडक; १६ जण जखमी

दापोलीत अपघात; जखमीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २५ ः दापोली-मंडणगड मार्गावरील मौजे दापोली येथील वेदांत बंगल्याजवळ आज सकाळी ७.१५ च्या सुमारास दोन एसटी बसेसची समोरासमोर ठोकर होऊन १६ जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
बोरिवली माटवणमार्गे दापोली बस (एमएच-२०-बीएल-२२४३) घेऊन चालक अंकुश भांडे दापोलीकडे येते होते, तर दापोलीतून दापोली मुरादपूर बस (एमएच-०७-सी-७२५३) घेऊन चंद्रकांत हांडे जात असताना आज सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे दापोली येथील वेदांत बंगल्याजवळ या दोन्ही बसेसची ठोकर झाली. या अपघातात दोन्ही बसेसच्या चालक व वाहकांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये सुहानी तांबे (१७, मौजे दापोली), ओमकार सकपाळ (१६, रा. मौजे दापोली), वारीज चाफेकर (२९, रा. दाभट ता. मंडणगड), विशाखा म्हस्के (२३, रा. पाचवली), सिया अहिरे (१६, मौजे दापोली), काशिनाथ शिरवणकर (७५) व अनुसया शिरवणकर (६७, रा. बोंडीवली), अक्षय दळवी (१८, रा. करंजाणी), शोभित आयरे (१६, मौजे दापोली), चंद्रकांत हांडे चालक, कमलाकर घडशे (४७, रा. मुरुड), नीलेश इंदुलकर (५३, वाहक, रा. दापोली), अंकुश भांडे-चालक, अंकुश खाणगे-वाहक, रमाकांत कालेकर (५५, रा. करंजाणी), सुविधा रेवाळे (४५, रा. कोंगळे) हे जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. अपघाताची माहिती मिळताच एसटीच्या आगार व्यवस्थापक मृदुला जाधव, पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली.
...
चौकट
५०० रुपयांची तातडीची मदत..
बोरिवली-दापोली बसचे चालक अंकुश भांडे यांनी रस्त्याची परिस्थिती न पाहता वेगाने बस चालवून समोरून येणाऱ्या एसटी बसला ठोकर दिल्याने त्यांच्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी प्रवाशांना एसटीकडून तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आले आहेत. दोन्ही बसेस दापोली आगारात आणण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी दिली. या अपघाताचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बुरटे करत आहेत.
-------------
चौकट
मुख्यमंत्री शिंदे यांचा फोन
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांना दूरध्वनी करून जखमींची चौकशी करून त्यांना चांगले उपचार देण्याबाबत सांगितले तर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही एसटीच्या आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली.
-----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90396 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..