खेड्याचा विकास तोच देशाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड्याचा विकास तोच देशाचा
खेड्याचा विकास तोच देशाचा

खेड्याचा विकास तोच देशाचा

sakal_logo
By

45665
फोंडाघाट ः येथील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना सुधीर सावंत.


खेड्याचा विकास तोच देशाचा

सुधीर सावंत ः फोंडाघाट महाविद्यालयात ‘समृद्ध आणि आदर्श गाव’

फोंडाघाट,ता. २६ ः खेड्याकडे चला हा महात्मा गांधींचा मंत्र खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधतो. खेड्याचा विकास हाच खरा देशाचा विकास, असे प्रतिपादन माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.
फोंडाघाट महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समृद्ध आणि आदर्श गाव’ कार्यक्रमात श्री. सावंत बोलत होते. ते म्हणाले की, ‘‘निसर्गाने भरभरून दिलेल्या सुंदर गावात आज यायला मिळाले याचा आनंद होतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच वाचन केले पाहिजे. मी तसे केल्याचा फायदा गुप्तहेर म्हणून व खासदार म्हणून काम करताना झाला. जगाची खडानखडा माहिती मुळे तंत्रज्ञानाचे प्रणेते स्वर्गीय राजीव गांधी यांना दिल्यामुळे मी त्यांचा लाडका झालो. जगातले पहिले सैनिक आणि पहिले शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्यामुळे आपण आहोत सर्वजण सुखी समृद्धी बद्दल बोलतात. पण आनंदी जीवनाबद्दल कोणी बोलत नाही. सामान्य नागरिक खूप काही करू शकतो हा आत्मविश्वास असला पाहिजे ते माहित नाही ते निर्धास्थपणे विचारणे हीच खरी ही आत्मविश्वासाची पहिली पायरी.’’
श्री. करंदिकर म्हणाले की, आपण नैसर्गिक शेती केली पाहिजे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपला गाव समृद्ध केला तरच देश समृद्ध होईल. आनंदी गाव ही संकल्पना राबवली पाहिजे.आपल्यातील दुही गुलामगिरीकडे नेणारा मार्ग असतो. कायद्याच्या पलीकडे हा देश चालतो.’’ डॉ. बालाजी सुरवसे यांनी परिचय केला. प्रा. संतोष आखाडे यांनी आभार मानले.
--
आरोग्य निट तर सर्व फिट
करंदिकर म्हणाले की, गरिबी आणि श्रीमंती यातील दरी देशाच्या विकासाला घातक आहे. शेतकरी समृद्ध आणि आनंदी जीवन जगला पाहिजे प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळे असते. नैसर्गिक जीवनात खूप मोठी ताकद असते. केमिकल खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आरोग्य नीट तर सर्व काही फिट.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90500 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..