रवींद्र चव्हाण आज जिल्ह्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवींद्र चव्हाण आज जिल्ह्यात
रवींद्र चव्हाण आज जिल्ह्यात

रवींद्र चव्हाण आज जिल्ह्यात

sakal_logo
By

४५७२५
रवींद्र चव्हाण


बांधकाममंत्री चव्हाण आज जिल्ह्यात

खारेपाटणला होणार स्वागत; मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा


कणकवली, ता.२६ : राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे उद्या (ता.२७) सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्गाची पाहणी करणार आहेत. सकाळी साडेअकराला त्‍यांचे सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्‍या खारेपाटण येथे आगमन होणार आहे. दरम्‍यान, श्री.चव्हाण यांनी रायगड जिल्ह्यापासून कोकण दौरा सुरू केला आहे. गणेशोत्‍सवापूर्वी महामार्ग निर्धोक करण्याबाबत त्‍यांनी अभियंत्‍यांना सूचना दिल्‍याची माहिती भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी आज दिली. तसे खारेपाटण येथे श्री.चव्हाण यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.
श्री.तेली म्‍हणाले, रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याला पनवेल येथून सुरूवात झाली. त्यानंतर रायगड, नागोठणे, वाकेड फाटा खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदी ठिकाणी दौरा करून रत्नागिरीत आगमन झाले. याही ठिकाणी दौऱ्याला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. चिपळूण येथे आढावा बैठकही झाली. आता उद्या शनिवारी ते रत्नागिरी शहरातून रस्त्याच्या कामाची पाहणी करत श्री. चव्हाण हे लांजा, राजापूर करून सिंधुदुर्गमध्ये दाखल होणार आहेत. खारेपाटणपासून रस्त्याच्या कामाची पाहणी करत दुपारी एक वाजता ते कणकवलीत पोहोचणार आहेत. खारेपाटण येथे सकाळी साडेअकराला त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. एक ते तीन वाजेपर्यंत ते कणकवलीत राखीव असून दुपारी साडेतीनला कुडाळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. यावेळी महामार्गाच्या कामांची ते पाहणी करणार असून त्यानंती सायंकाळी चारला कुडाळ येथे आढावा बैठक व पत्रकार परिषद होणार आहे. सायंकाळी पावणेपाचला झारापला रस्ताकामाची पाहणी करुन पुढे सावंतवाडीहून गोव्याकडे रवाना होणार आहेत.
----
वाहतूक निर्धोकसाठी पावले
श्री. चव्हाण यांच्या या दोन दिवशीय दौऱ्यात मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक निर्धोक होण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. गणेशोत्सवानिमित येणारे चाकरमानी, वाहनचालकांना प्रवास सुखकर होण्याच्यादृष्टीने संबंधीत अधिकारी व ठेकेदार कंपन्यांना आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. गणेशोत्सवापुर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची सर्व कामे तातडीने पूर्ण होत असल्याची माहिती श्री. तेली यांनी दिली.
--
कुडाळातही होणार स्वागत
कुडाळ ः राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कुडाळ तालुका भाजपाच्यावतीने त्यांचे गांधी चौकात प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्या उपस्थितीत स्वागत होणार आहे. दुपारी तीनला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे यांनी केले. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर चव्हाण यांचे जिल्ह्यात आगमन होत असल्याचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90569 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..